Prashant Koratkar : दिसेल तेथे ठेचून काढा… कोरटकरच्या विरोधात फर्मान!

 

The strong stand of the Sakal Maratha Mahasangh against Prashant Koratkar : मुधोजी राजे भोसले संतापले; सकल मराठा महासंघाची तातडीची बैठक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मागे अदृष्य शक्ती असल्यामुळे त्याची हिम्मत वाढली. मात्र, छत्रपतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अशा वृत्तींना ठेचून काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे कोरटकरला दिसेल तेथेच ठेचून काढा, अशी भूमिका सकल मराठा महासंघाच्या बैठकीत घेण्यात आली. यावेळी कोरटकरच्या विरोधात मुधोजी राजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.

बुधवारी सायंकाळी भोसला पॅलेसमध्ये सकल मराठा महासंघाची बैठक घेण्यात आली. मुधोजी राजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान कोरटकरने केले. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ केला. तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या विरुद्ध कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आहे.

Prashant Koratkar : कोरटकरच्या घरापुढे आंदोलन; अडचणी वाढल्या!

 

पोलीस कोरटकरचा शोध घेत आहेत. परंतु, कोरटकर हा कार घेऊन पळाला आहे. त्याचा पोलीस शोध घेऊ शकले नाहीत. यावरुन पोलिसांची भूमिका तपासण्याची गरज आहे. गुरुवारी दुपारी पोलीस आयुक्तांना सकल मराठा महासंघ (नागपूर) यांच्यावतीने निवेदन देणार आहेत. कोरटकरला अटकपूर्व जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असंही मुधोजी भोसले म्हणाले.

कोरटकरविरुद्ध सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोरटकरसारख्या प्रवृत्तीला ठेचून काढून धडा शिकविण्यात येईल. यादरम्यान, राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. भविष्यात कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढण्याची हिंमत करणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात येईल, असा इशाराही भोसले यांनी दिला.

Local Body Elections : निर्णय लांबणीवर, इच्छुकांची वाढली चिंता!

 

यावेळी सकल मराठा महासंघाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बैठकीनंतर मुधोजी राजे भोसले Raje Mudhoji Bhosle यांच्या नेतृत्वात कोतवाली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावेळी नरेंद्र मोहिते, शिरिष राजे शिर्के, जयसिंह राजे भोसले, सारंग ढोक, बाबाजी शेळके, डॉ. प्रकाश मोहिते, जीतेंद्र खोत आणि हाजी सैयद अली उपस्थित होते.