Efforts to get railway concessions for journalists : केंद्रीय राज्यमंत्र्यांचा शब्द; ‘पत्रयोगी जीवनगौरव’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
Buldhana पत्रकारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे सवलती पुन्हा सुरू करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे, असा शब्द केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला. पत्रकारांच्या आरोग्य सेवेसाठी आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून विशेष योजना राबविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पत्रकारितेसाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा ‘पत्रयोगी जीवनगौरव’ देऊन सन्मान करण्यात आला. बुलढाण्यातील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Mahayuti Government : ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा होणार तरी कधी ?
बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ६० वर्षांवरील ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र वितरकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्ह्यातील आमदारांनीही उपस्थित राहून पत्रकारांच्या योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे होते, तर सुप्रसिद्ध न्यूज विश्लेषक प्रसन्न जोशी यांनी विशेष उपस्थिती लावली.
या सोहळ्याला आमदार संजय कुटे, संजय गायकवाड, धीरज लिंगाडे, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, तसेच मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती.
Guardian Secretary Saurabh Vijay : दरडोई उत्पन्न वाढीसाठी क्रमवारीत सुधारणा आवश्यक
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केले. या वेळी पत्रकारितेच्या आव्हानांवर चर्चा झाली. अॅड. आकाश फुंडकर यांनी पत्रकारांच्या मागण्यांसाठी शासनस्तरावर ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
‘पत्रकारांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या आर्थिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे,’ असेही त्यांनी सांगितले. आ. संजय गायकवाड यांनी पत्रकार आणि राजकीय नेत्यांमधील सहकार्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. या सोहळ्यात ८७ ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र वितरकांचा शाल, सन्मानचिन्ह, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.