Breaking

Prataprao Jadhav : एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत मैत्री कायम ठेवून पक्षाची विचारसरणी जपली !

 

Eknath Shinde maintained his friendship with the BJP and upheld the party’s ideology : बुलढाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश

Buldhana : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी संघटन मजबूत करून केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. मासरूळ येथे आयोजित एका सोहळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी मंत्री जाधव बोलत होते.

या पक्षप्रवेश सोहळ्यात सेवादल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन लांडे, माजी सरपंच ज्योती लांडे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष देवीदास जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजू पवार, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माया म्हस्के, युवासेनेचे अमोल शिंदे, मयूर पडोळ, संदीप पालकर आदी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal : स्त्री -पुरुष समानतेचे फुले दाम्पत्याचे स्वप्न आज साकार होत आहे !

शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष
मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, “शिवसेनेने नेहमीच कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. अनेक कार्यकर्ते आमदार, खासदार आणि मंत्री झाले आहेत. हिंदुत्ववादी विचारधारेवर कार्यरत असलेल्या शिवसेनेला काही स्वार्थी नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मैत्री कायम ठेवून पक्षाची विचारसरणी अबाधित ठेवली.”

Akola Cyber ​​Cell : अकोला पोलिसांकडून सायबर पेट्रोलिंग; ४१ आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या

ते पुढे म्हणाले की, “राज्यात आणि केंद्रात शिवसेना व भाजप सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्या जनतेपर्यंत पोहोचवून आगामी स्थानिक निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा बुलंद करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.” या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट होईल, अशी भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.