Prataprao Jadhav, Siddharth Kharat : माजी मंत्र्याचे केंद्रीय मंत्री व आमदाराला खरमरीत पत्र!

Former minister’s advice on risking political prestige to declare a wet drought : ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावण्याचा सल्ला

Buldhana मेहकर-लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचे तीन वेळा झालेले पेरणीचे अपयश, अतिवृष्टीमुळे झालेल्या भीषण नुकसानीबाबत शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावा, असा थेट सल्ला माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार सिद्धार्थ खरात यांना दिला आहे.

सावजी यांनी या दोन्ही नेत्यांना दिलेल्या पत्रात तिखट शब्दांत खडसावताना म्हटले आहे की, “शेतकऱ्यांची पेरणी तीनदा अपयशी ठरली. अतिवृष्टीमुळे पिकांची व जमिनीची चाळण झाली. पाणी साचून शेतकऱ्यांचा जीव गेला, बांध फुटले, विहिरी पडल्या; परंतु पंचनाम्यात खरी हकीकत दिसत नाही. तुम्ही फक्त श्रेय घेण्यासाठी सभा, मेळावे घेता; पण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासनावर दबाव आणत नाही. ६८ कोटींची नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे.”

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोडा! मुंबईच्या व्यापाऱ्याचे ४.६० कोटींचे सोने लुटले

त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, ढगफुटीमुळे झालेले नुकसान आणि ओल्या दुष्काळातील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत इतर कोणतेही राजकीय इव्हेंट थांबवा. जर शासन ऐकत नसेल तर सत्याग्रह करा, मतदारांचा पाठिंबा घ्या. “तुम्ही ३० वर्षे लोकप्रतिनिधी, आता केंद्रात मंत्री आहात; शेतकऱ्यांसाठी ताकद दाखवायची वेळ आली आहे.”

Gambling house : नितेश राणे यांची कणकवलीत मटका अड्ड्यावर धाड !

सावजींनी या पत्रातून स्वतःचा राजकीय अनुभव मांडत सांगितले की, “मी १९७८ पासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या दालनात सत्याग्रह, उपोषण, जेलभरो, मंत्री व अधिकाऱ्यांना जाब विचारणे हे केले. आता हीच भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल.” “पक्षाचे मेळावे, नवे कार्यकर्ते आणणे थांबवून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शासनावर दबाव आणा. अन्यथा आम्हालाच पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.”असेही सावजी यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे मेहकर-लोणार तालुक्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.