Pravin datke : मुख्यमंत्र्यांच्या शहरातील कामगार मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव कोणी रोखला?

ESIC-Medical-College-project-of-nagpur-stalled : आमदारांनी आरोग्यमंत्र्यांना धरले धारेवर, केंद्राच्या प्रकल्पात नागपूरचा होता समावेश

Nagpur काँग्रेसच्या काळात विदर्भातील अनेक प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात पळवले जात होते. विद्यमान मुख्यमंत्र्यांसह भाजपचे अनेक नेते यावरून सरकारला धारेवर धरून आरोप करीत होते. मात्र आता राज्यात भाजपचे सरकार आहे. नागपूरकर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. असे असताना नागपूरचा वगळून कामगार विभागाने नवीन मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. ही बाब भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी निदर्शनास आणून देऊन सरकारला सवाल केला.

केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा निगमची बैठक मागील जून महिन्यात हिमाचल प्रदेशमधील सिमलामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये देशभरामध्ये १० नवीन मेडिकल कॉलेज स्थापन करण्याच्या निर्णय झाला. यामध्ये महाराष्ट्रात नागपूर आणि पुण्याचा समावेश होता. देशभरातील इतर नऊ ठिकाणी कामगार विभागाने मेडिकल कॉलेजसाठीचा प्रस्ताव पाठवला आहे.

Pune municipal corporation : अखेर पुण्याचं ठरलं! महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर

फक्त नागपूरचा प्रस्ताव अद्याप शासनाला सादर झाला नसल्याबाबत प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्नावर बोलताना खंत व्यक्त केली. नागपूरचे नेतृत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे ज्येष्ठ नेते करत असताना देखील मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव पाठवण्यास विलंब का असा प्रश्न प्रवीण दटके यांनी विचारला.

हा प्रस्ताव पाठवल्यास एमबीपीएसच्या जागा वाढणार असून जीएमसी, आयजीएमसी सोबतच कामगार रुग्णालय मेडिकल कॉलेजच्या रूपात तिसरे मेडिकल कॉलेज नागपुरात तयार होईल, असे दटके म्हणाले.
नागपुरात नवे नागपूर आणि मिहान या माध्यमातून मोठी कामगार वसाहत निर्माण होत आहे, त्यांना यामाध्यमातून लाभ होईल तसेच रोजगार निर्मितीसुद्धा होणार आहे. हनुमान नगर, सिरसपेठ येथे सध्या तीन एकर मध्ये असणाऱ्या कामगार रुग्णालयात फक्त ओपीडी होते, नवीन मेडिकल कॉलेज झाल्यास मोठ्याप्रमाणात कामगार रुग्णांना लाभ होईल.

राज्य कामगार विमा महामंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे स्थापित करण्याबाबत सामंजस्य करार कधी केला ? त्याची सद्यःस्थिती काय आहे ? कामगार विभागाची स्वतःची जागा उपलब्ध असताना तसेच आरोग्य विभागाकडे ही जागा उपलब्ध असताना प्रस्ताव पाठवण्यासाठी विलंबाची कारणे काय आहेत, राज्यात किती कामगार हॉस्पिटल आहेत, या कामगार हॉस्पिटलमध्ये पुरेशी यंत्रणा वैद्यकीय उपकरणे आहेत का, ती चालू स्थितीत आहेत का आणि कामगार रुग्णालयात काम करणारे कर्मचारी कायमस्वरूपी आहेत का असे प्रश्नही दटके यांनी विधानसभेत उपस्थित केले.

Nagpur Municipal corporation : नागपूर महापालिकेचे बजेटही राहणार महिला ‘स्पेशल’!

सोबतच नागपूर येथील कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज कधी पर्यंत कार्यान्वित करणार अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विमा रुग्णालयाचे मेडिकल कॉलेज स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगितले तसेच प्रस्ताव पाठवण्यापूर्वी तांत्रिक त्रुटी दूर करून प्रस्ताव नव्याने केंद्र सरकारला पाठवू असे आश्र्वासित केले.