14 people, including two doctors, suspended : रुग्णसेवेत हलगर्जीपणा भोवला, जिल्हा परिषद सीईओंची कारवाई
Buldhana कर्तव्यातील हलगर्जी आणि रुग्णसेवेत झालेल्या गंभीर त्रुटींवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी आरोग्य विभागावर दणका दिला आहे. देऊळगाव माळी, बोराखेडी, पिंप्री गवळी आणि उदयनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तपासणीत अनियमितता उघड झाल्यानंतर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
१९ आणि २० ऑगस्ट रोजी झालेल्या या कारवाईमुळे विभागात खळबळ उडाली आहे. तपासणीत औषधसाठ्याची दयनीय अवस्था, अस्ताव्यस्त व्यवस्थापन, घाणेरडी बेडशीट्स, अद्ययावत नसलेली नोंदवही असे धक्कादायक प्रकार उघड झाले. याशिवाय बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाचा अभाव आणि परिचारिकांनी इंजेक्शनच्या काचा खिडकीतून बाहेर फेकल्याचे प्रकार निदर्शनास आले.
Healthcare on the verge of collapse : एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंद संप तीव्र
सीईओ खरात म्हणाले, “कर्तव्यात कसूर खपवून घेतले जाणार नाही. रुग्णसेवेतील हलगर्जीवर कठोर कारवाई होणार.” यापूर्वी कमी पटसंख्येवर ३५ शिक्षकांचे निलंबन करून खळबळ उडवून दिल्यानंतर सीईओंनी आता आरोग्य विभागावर लक्ष केंद्रीत केले आहे.
निलंबितांमध्ये देऊळगाव माळीचे डॉ. विशाल सुरुशे आणि बोराखेडीचे डॉ. विवेक थिगळे यांचा समावेश आहे. तसेच कनिष्ठ सहाय्यक, परिचारक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर आदींचाही समावेश आहे.
Devendra Fadanvis : आमदार संदीप जोशींना मुख्यमंत्र्यांनी दिले सरप्राईज !
बुधवारी (२० ऑगस्ट) दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनावर स्वाक्षरी करण्यात आली. जवळपास दोन महिने अनुपस्थित राहणे आणि रुग्णालयातील अस्वच्छ, अस्वस्थ करणारी स्थिती यामुळे ही कारवाई केल्याचे सीईओंनी स्पष्ट केले. या धडक कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ माजली असून, आणखी काहींवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.








