Breaking

Public Safety bill : काँग्रेसचे नेते म्हणतात, जनसुरक्षा कायदा म्हणजे हुकूमशाहीचा पोशाख

Congress leader Rahul Bondre criticizes the government : माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा राज्य सरकारवर घणाघात

Chikhali राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून पारित करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, चिखली येथे या कायद्याची होळी करत तीव्र निषेध करण्यात आला. “हा कायदा म्हणजे लोकशाहीच्या गळा घोटण्याचा प्रयत्न असून, राज्यघटनेच्या मूल्यांना काळा डाग लावणारा हा हुकूमशाही कायदा आहे,” अशी घणाघाती टीका जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केली.

२१ जुलै रोजी चिखली शहरात काँग्रेसतर्फे ‘जनसुरक्षा कायदा होळी आंदोलन’ छेडण्यात आले. यावेळी बोलताना बोंद्रे म्हणाले की, “सरकार बहुमताच्या बळावर विरोधकांचा आवाज दाबत आहे. विधिमंडळात योग्य चर्चेला संधी न देता, हा कायदा जबरदस्तीने मंजूर करण्यात आला. हा कायदा सामाजिक कार्यकर्ते, आंदोलक, आणि विरोधी विचार मांडणाऱ्यांना धास्तावून टाकण्यासाठी आणण्यात आला आहे.”

Election Commission : कामं करायला माणसच नाहीत, निवडणुका घ्यायच्या कश्या?

या आंदोलनात काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये तालुका काँग्रेस अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल सवडतकर, प्रा. निलेश गावंडे, प्रा. राजू गवई, सभापती डॉ. संतोष वानखेडे, युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, यांच्यासह नगरसेवक, विविध पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

बोंद्रे पुढे म्हणाले, “सरकार लोकशाही पायदळी तुडवत असून, आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्यांना ‘देशद्रोही’ ठरवण्याची भीतीदायक शक्यता या कायद्यामुळे निर्माण झाली आहे.”

Amravati belora airport : अमरावती-मुंबई विमानसेवेचे दर परवडत नाही, वेळही गैरसोयीची!

काँग्रेसने राज्यभरात या कायद्याविरोधात आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे. “जनतेचे मूलभूत अधिकार हिरावून घेणाऱ्या कोणत्याही कायद्याचा काँग्रेस प्रखर विरोध करेल,” असा स्पष्ट इशाराही राहुल बोंद्रे यांनी दिला.