व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Amravati belora airport : अमरावती-मुंबई विमानसेवेचे दर परवडत नाही, वेळही गैरसोयीची!

Amravati belora airport : अमरावती-मुंबई विमानसेवेचे दर परवडत नाही, वेळही गैरसोयीची!

Complaint to Union Minister that Amravati-Mumbai flight fares are unaffordable : खासदार बळीराम वानखडे यांची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे तक्रार

Amravati अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू व्हावी म्हणून अनेक वर्षांपासून मागणी लावून धरण्यात आली. महायुती सरकारने ही बाब मनावर घेतली आणि विमानसेवा सुरू झाली. पण आता सुविधेपेक्षा अडचणींचाच डोंगर उभा झाला आहे. अचानक विमान रद्द होणे, तिकिटांचे दर वाढणे याशिवाय विमानाच्या वेळाही फार गैरसोयीच्या आहेत. याचसंदर्भात आता नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना तक्रार करण्यात आली आहे.

अमरावती-मुंबई हवाई मार्गावरील अलायन्स एअरच्या विमानसेवेचे दर सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. हे भाडे तातडीने कमी करावे आणि विमानाच्या वेळाही बदलाव्या, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे. त्यांनी अलीकडेच मंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपवले.

Chandrashekhar Bawankule : पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना बजावली ‘शो कॉज’!

गेल्या काही दिवसांमध्ये या विमानसेवेच्या भाड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, याचा मोठा आर्थिक बोजा प्रवाशांवर पडत आहे. अमरावती ते मुंबई हा प्रवास अधिक सुलभ, स्वस्त आणि सर्वसामान्यांसाठी परवडणारा राहावा याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शहर असून येथे शिक्षण, औद्योगिक, तसेच प्रशासकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक मुंबईकडे प्रवास करतात. मात्र, सध्या या विमानसेवेचा वेळ दुपारी असल्यामुळे व्यावसायिक, नोकरदार, तसेच इतर प्रवाशांसाठी ती फारशी उपयुक्त ठरत नाही.

वानखडे यांनी अशी मागणी केली आहे की, अमरावतीहून मुंबईकडे सकाळी आणि मुंबईहून परत संध्याकाळी विमानसेवा सुरू करण्यात यावी. यामुळे प्रवासी एकाच दिवशी मुंबईत आवश्यक कामे उरकून परत अमरावतीला पोहोचू शकतील.

Local Body Elections : जिल्हा परिषद व पंचायत समिती गट-गण रचनेवर १४ हरकती!

या मागणीबाबत झालेल्या चर्चेत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी खासदार वानखडे यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवण्याचे निर्देश दिले असून, प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासनही दिले आहे.

error: Content is protected !!