Protesting at the sub-divisional office, demanding road repairs : उपविभागीय कार्यालयावर धडक देत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
Chikhali तालुक्यातील चिखली-जाफराबादसह बहुतेक प्रमुख रस्त्यांची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन ठाकरे गटाच्या शिवसेना Uddhav Balasaheb Thackarey Shivsena, युवा सेना आणि किसान सेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) चिखली उपविभागीय कार्यालयावर धडक देत अभियंत्यांचा घेराव केला.
गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून, खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने नवीन रस्त्यांची कामे मंजूर करूनही ती सुरू न होणे आणि जुन्या रस्त्यांकडे सर्रास दुर्लक्ष होणे, यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले.
Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवारांच्या समर्थनार्थ रोहित पवार उभे ठाकले
यावेळी पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांना धारेवर धरत तातडीने जुन्या रस्त्यांची दुरुस्ती सुरू करण्यासह नवीन मंजूर रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी केली. घेरावामुळे कार्यालयात एकच धांदल उडाली. अभियंत्यांनी सुरुवातीला वेळ मागण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी ठाम भूमिका घेतली. अखेर चर्चेनंतर चार दिवसांच्या आत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
Local Body Elections : जि. प., न. प.च्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लागले लक्ष
या आश्वासनानंतर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु वेळेत काम सुरू झाले नाही तर आणखी मोठ्या आंदोलनाची चेतावणीही देण्यात आली. या आंदोलनात तालुक्यातील शिवसेना, युवा सेना, किसान सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








