Maharashtra is a hotbed of bogus seeds, sensational statement of Congress leader Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप
Nagpur : महाराष्ट्रात बोगस बियाणे येत असतील तर सरकार काय करत आहे? अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे का, हे तपासले पाहिजे. यासंदर्भात थातुरमातूर उचपार करण्याचे विचार झाले, पण कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नाही. जे लोक बोगस बियाणांची विक्री करतात, त्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी नवीन बील आणावे आणि अशा लोकांना माफ करता कामा नये. सद्यस्थितीत महाराष्ट्र हा बोगस बियाणांचा अड्डा झाला आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
नागपुरात आज (२३ मे) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, माझ्या विधानसभा मतदारसंघातही शेतकऱ्यांना सुद्ध वान मिळत नाही. बोगस बियाणे मिळतात. पण यासंदर्भात सरकारकडून कुठलीही भूमिका आली नाही. हे सरकार शेतकऱ्यांप्रति उदासीन आहे, हे वारंवार समोर येत आहे. या हंगामात तरी सरकारने बोगय बियाणांची विक्री थांबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. नाही तर हेच शेतकरी सत्ताधाऱ्यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
हगवणे प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता, या प्रकरणाची माहिती मी घेतली आहे. आता आमच्या रुपालीताई चाकणकर काय कारवाई करतात, हे पाहावं लागेल. अजित पवारही बोलले आहेत की, काही लोक आम्ही चुकीने पक्षात घेतले आहेत. त्यामुळे चुकीचे लोक घेत असताना खालच्या लोकांचा इंटरेस्ट पाहून घेतले पाहिजे. एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याने हुंड्यासाठी नऊ महिन्यांचे बाळ असलेल्या सुनेचा खून करावा? होय.. हा खूनच आहे. असले प्रकार थांबवण्याची गरज आहे. राजकीय पक्षातील लोक असे वागत असतील तर महाराष्ट्रात कुणीकडे चालला आहे, हा प्रश्न उपस्थित होतो, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.