Rahul Bondre : ‘टँलेंट’ शोधण्याची जबाबदारी राहुल बोंद्रेंवर!

rahul-bondre-amravati-division-coordinator-forcongress-talent-hunt : अमरावती विभाग समन्वयकपदी निवड; काँग्रेसचे अभियान सुरू

Chikhli राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बळकटीसाठी नवे धोरण अवलंबत आक्रमक पद्धतीने पक्षविस्ताराला सुरुवात केली आहे. पारंपरिक कार्यकर्त्यांवर अवलंबून राहण्याऐवजी विचारसरणी, संविधान आणि लोकशाही मूल्यांवर निष्ठा असलेल्या सुशिक्षित तरुणांना राजकारणात सक्रिय करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यभर ‘प्रतिभा शोध अभियान’ (टॅलेंट हंट) राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अमरावती विभागीय समन्वयकपदी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक प्रश्न प्रभावीपणे मांडू शकणाऱ्या तळागाळातील सक्षम व अभ्यासू व्यक्तींचा शोध घेणे हा आहे. निवड झालेल्या तरुणांना विविध विषयांवर प्रशिक्षण देऊन पक्षासाठी सक्षम नेतृत्व घडविण्याचा काँग्रेसचा मानस आहे. या अभियानांतर्गत संशोधन विश्लेषक, मीडिया प्रवक्ते-पॅनलिस्ट तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागासाठीही प्रतिभावान व्यक्तींची निवड केली जाणार आहे.

Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पाची ‘बॅग’ डॉ. संजय कुटेंच्या हातात; विधिमंडळात रंगला रंजक प्रसंग

युवकांमध्ये राजकीय जाण, संवाद कौशल्य आणि सामाजिक प्रश्नांवरील अभ्यास वाढविण्यासाठी विशेष कार्यशाळा व प्रशिक्षण सत्रांचे आयोजनही करण्यात येणार आहे. या माध्यमातून पक्षाला नव्या पिढीचे सक्षम नेतृत्व मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Sandip Shelke : जिल्हा समन्वयकपदाचा राजीनामा, आता जिल्हाध्यक्ष होणार?

दरम्यान, राहुल बोंद्रे यांनी यापूर्वी कर्नाटक आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षासाठी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच अमरावती महानगरपालिका निवडणुकीत निरीक्षक म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती. आता अमरावती विभागात ‘टॅलेंट हंट’ अभियान यशस्वीपणे राबवून संघटन बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.