Breaking

Railway station : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे की महात्मा फुले रेल्वे स्टेशन!

the demand made by mp. Medha Kulkarni, the appose started :
खा. मेधा कुलकर्णीं कडून मागणी होताच विरोधही सुरू

Pune: पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी मागणी खा मेघा कुलकर्णी यांनी आज रेल्वेच्या विभागीय बैठकीत केली. अनेकविध संघटनांची तशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पुणे रेल्वे स्थानकाला पेशव्यांऐवजी महात्मा फुलेंचे नाव द्यावे अशी मागणी समोर येत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला त्या त्या जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. पुणे रेल्वे स्टेशन आणि पुणे शहरासंबंधीत प्रश्न मी या बैठकीत उपस्थित केले. यातील एक मुद्दा होता तो म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. आजच्या बैठकीत मी त्याचा पुनरुचार केला आहे. अशी माहिती खा. कुलकर्णी यांनी दिली.

Gadchiroli News : क्या हुआ तेरा वादा…! म्हणत लेकीचे, आमदार वडिलांविरोधात ठिय्या आंदोलन!

 

कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु, पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे शैक्षणिक शहर आहे, आयटी हब आहे. त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरली बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

School Education : विद्यार्थ्यांनीच केली स्वतःच्या स्वागताची तयारी!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे त्यांनी केले आहे. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला तसाच थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केला आहे. या कामात बाजीराव पेशवे यांचे देखील योगदान मोठे आहे. थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले, एकही हरले नाही. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात. त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात. छत्रपती शिवरायांचा वारसा त्यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा थोरल्या बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितल.

Sandeep Deshpande : सरकारमध्ये षंढ लोक बसले असतील तर करायचं काय?

पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पुढे परंतु या नावाला आमचा विरोध आहे. कारण रयतेचे राजे शिवाजी महाराजांची समाधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली आणि पुढे जाऊन शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी केली, आणि याचा उल्लेख तत्कालीन वर्तमानपत्र दिनबंधू यांमध्ये आहे तसेच स्त्री शिक्षणाचा यशस्वी लढा दिला त्यामुळे आमचा पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे नाव देण्यास विरोध आहे आणि आमची मागणी आहे की क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव पुणे रेल्वे स्टेशन ला देण्यात यावे, अशी मागणी रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केली आहे.

 

Dr. Rajendra Shingne : सत्ताधाऱ्यांच्या प्रलोभनांना जनता कंटाळली, शिंगणे यांचा दावा

देशात भाजपचे सरकार आल्यानंतर शहरांसह अनेक जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचेही नामांतर करण्यात आलं आहे. त्यामुळे, जनभावनांचा आदर करत हे नामांतर करण्यात आल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं. आता, पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे.

___