Rain alert : राज्यात मुसळधार पावसाचा तांडव, 21 जणांचा मृत्यू !

Red alert for five districts, information from Ajit Pawar : पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट, अजित पवारांची माहिती

Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात झालेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी आहेत. दीड हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय १४ लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने हालहवाल झाले आहेत.

मुंबईत काल दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. हजारो प्रवासी स्थानकांवर अडकले होते. कार्यालयीन कर्मचारी दिवसभर धावपळ करून घरी परतले. यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Local Body Elections : जि.प., पं.स. निवडणुकांच्या प्रभाग रचनेवर अंतिम निर्णय आयुक्तांकडे

आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड या पाच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यालाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही धरणे १०० टक्के भरल्याने पाणी सोडण्याची वेळ आली असून त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मुळा व पवना नद्यांच्या काठावरील भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागांतील काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. “सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येथील इटियाडोह धरण १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. शिरपूर, कालीसराळ आणि पुजारीटोला धरणातही चांगला पाणीसाठा असून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटल्याचे प्रशासनाने सांगितले.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार तलाव काठोकाठ भरला असून तो वाहू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. सांगली आणि मिरज भागात नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून औदुंबरच्या दत्तमंदिरासह अनेक वस्त्यांत पाणी शिरले आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

Local Body Elections : अमरावती जि.प.मध्ये ३० महिला, २९ पुरुषांचे प्रतिनिधित्व; १६ जागा ओबीसींसाठी राखीव?

या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे आणखी हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने यंत्रणा सज्ज ठेवली असल्याचेही सांगण्यात आले आहे.