Final decision on ward structure for Z.P., P.S. elections lies with the Commissioner : दोन दिवसांत मिळणार मान्यता, त्यानंतर आरक्षण जाहीर होणार
Akola जिल्हा परिषद (जि. प.) आणि पंचायत समिती (पं. स.) निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्याचा अधिकार आता विभागीय आयुक्तांना देण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २२ ऑगस्टपर्यंत प्रभाग रचनेला मान्यता देऊन अहवाल ग्रामविकास विभाग व निवडणूक आयोगाला पाठविला जाणार आहे.
यापूर्वी १८ ऑगस्टपर्यंत अंतिम आराखडा सादर करण्याची मुदत होती. आता २२ ऑगस्टपर्यंत शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिकेवर निर्णय दिल्यानंतर या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर प्रभाग रचना जाहीर होऊन हरकती मागविण्यात आल्या. त्या तहसील कार्यालयांत दाखल झाल्या. सुनावणी करून जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. विभागीय आयुक्त २२ ऑगस्टपर्यंत अंतिम रचनेला मान्यता देतील. त्यानंतर निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होईल.
राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या
वंचित बहुजन आघाडी : अडीच दशकांपासून सत्ता टिकवून ठेवलेल्या पक्षाकडे ५५० पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज, त्यात ५०% ओबीसी.
शिवसेना (ठाकरे गट) : उमेदवार चाचपणीसाठी बैठका सुरू; विद्यमान तीन सदस्य शिंदे गटात गेले.
शिवसेना (शिंदे गट) : आजी-माजी ३० सदस्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न.
भाजप : यंदा निवडणुकीकडे गांभीर्याने पाहणार; बैठका सुरू.
काँग्रेस-राकाँ : अद्याप जाहीर हालचाल नाही.
Local Body Elections : नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत बदल; अनुभवी नेत्यांची पंचाईत!
मतदारसंघांची संख्या
जि. प. : एकूण ५२ प्रभाग
पं. स. : एकूण १०४ प्रभाग
तालुकानिहाय लोकसंख्या (प्रमुख) :
तेल्हारा – १.३० लाख, बाळापूर – १.४४ लाख, मूर्तिजापूर – १.३४ लाख, पातूर – १.२३ लाख.








