Rajendra Shingne : राजकीय सुडातून मला तुरुंगात टाकण्याचा डाव

Former minister alleges a conspiracy behind the district bank inquiry : जिल्हा बँक चौकशीमागे षडयंत्र असल्याचा डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा आरोप

Deulgao Raja बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवरील चौकशीचे प्रकरण पुन्हा एकदा तापले असून, हे प्रकरण सरळ राजकीय सूडाचे बनविण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे. “जिल्हा बँकप्रकरणात राजकीय सूड उगवून मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले.

शिंगणे यांनी थेट सरकारवर बोट ठेवत म्हटले की, सिंदखेड राजा मतदारसंघातील काही व्यक्तींच्या सांगण्यावरून ही कारवाई केली जात आहे. “जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून येथे कोणताही गैरव्यवहार झाल्याचे चौकशीतून कधीच सिद्ध झालेले नाही. न्यायालयानेही क्लीनचिट दिल्यानंतरही चौकशी पुन्हा सुरू करणे म्हणजे सूडबुद्धीचे राजकारण आहे.”

Security Cess Bill : तंबाखू, सिगारेट आणि पान मसाला होणार महाग

ते पुढे म्हणाले, “मतदारसंघातील दोन खबऱ्यांकडून वरिष्ठ नेत्यांना चुकीची माहिती पुरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझा वाढता जनाधार काहींच्या पचनी पडत नसल्याने हे सर्व डावपेच खेळले जात आहेत.”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या “वय झाल्यावर थांबायचं असतं” या टीकेवर पलटवार करत शिंगणे म्हणाले “थांबायचं की पुढे जायचं हे जनता ठरवते. दादांनी पूर्वी पत्नीचा, आता मुलगा पार्थ पवारचा पराभव कसा झाला याचा आत्मचिंतन करावे. मी जनतेच्या बळावर उभा आहे; पदाचा दिमाख दाखवून टीका करण्याची गरज नाही. धमक कामात असते, शब्दांत नाही.”

Job in Germany : जर्मनीत मिळणारी दहा हजार नोकऱ्यांची संधी हुकली,

शिंगणे आणखी जोर देऊन म्हणाले— “एका वर्षात मतदारसंघात कोणते विकासाचे दिवे लावले? जनता याचा हिशोब विचारते आहे. आमच्यावर खोटे आरोप करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका.”

“मुद्दे मुद्दाम पुढे करून मला राजकीयरीत्या अडचणीत आणणे, अगदी जेलमध्ये टाकण्यापर्यंतचा प्रयत्न सुरू आहे”, असा धक्कादायक दावा त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेल्या निष्ठेचा उल्लेख करत शिंगणे म्हणाले— “पडत्या काळात पवार साहेबांना साथ सोडणे मनाला पटत नाही. मी घाबरणार नाही. दडपशाहीला झुकणार नाही. लोकांचा विश्वास माझी ताकद आहे.”

Local Body Elections : महापालिका निवडणूक तयारीचा वेगाने आढावा

शिंगणे यांच्या या आरोपांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलाच तडाखा बसला आहे. समर्थकांमध्ये नाराजी वाढली असून सरकारवर राजकीय दबावाखाली चौकशी करण्यात येत असल्याची चर्चा वेगाने पसरत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्र, आगामी निवडणुकांचे गणित आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.