all-seven-candidates-including-sharad-pawar-parth-pawar-unopposed-rajya-sabha-election : शरद पवार, तावडे, आठवले, इवनाते, पार्थ पवार, वडकुते, ज्योती वाघमारे यांचा समावेश
Mumbai महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत यंदा सातही जागांसाठीची लढत बिनविरोध ठरली आहे. सात जागांसाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र छाननी प्रक्रियेनंतर त्यापैकी केवळ सात अर्ज वैध ठरल्यामुळे उर्वरित अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे सात जागांसाठी सातच उमेदवार उरले आणि सर्व उमेदवारांची खासदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण केल्यानंतर ही घोषणा केली.
Gram Panchayat Elections : ‘गुगल अर्थ’वर गावे अजूनही पाण्याखाली; प्रभागरचनेत तांत्रिक अडथळा
राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी सुरुवातीला १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र अर्जांमधील तांत्रिक त्रुटी, आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता तसेच नियमांनुसार पात्रता न ठरल्यामुळे पाच अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे अखेरीस सातच उमेदवार शिल्लक राहिले आणि निवडणूक प्रक्रिया मतदानाशिवाय पूर्ण झाली. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही राजकीय आघाड्यांमध्ये या निवडणुकीसाठी आधीपासूनच चर्चा सुरू होती. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीला सहा जागा आणि विरोधकांना एक जागा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. अखेरीस त्याच राजकीय समीकरणानुसार उमेदवार निश्चित करण्यात आले.
Farmers loan waiver : अटी-शर्तींनंतरच पात्र शेतकऱ्यांचा आकडा स्पष्ट होणार
महायुतीकडून विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते, पार्थ पावर आणि ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पावर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. सर्व उमेदवारांच्या नावांवर दोन्ही आघाड्यांमध्ये समन्वय झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत कोणत्याही वैध उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सातही उमेदवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यामुळे नियोजित मतदानाची गरज उरली नाही. महाराष्ट्रातून राज्यसभेतील काही विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. नव्याने निवडून आलेले सदस्य पुढील सहा वर्षांसाठी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.








