Rajya sabha election : मोठी घोषणा: राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील ४ उमेदवार जाहीर

rajya-sabha-election-2026-bjp-maharashtra-candidate-list-ramdas-athawale-vinod-tawde : रामदास आठवले, विनोद तावडे यांच्यासह चार जणांना भाजपची संधी

Mumbai : राज्यसभा निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील आपल्या चार उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना पक्षाने उमेदवारी बहाल केली असून या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री विनोद तायडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विद्यमान संख्याबळाच्या आधारावर भाजपचे चारही उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पक्षाने गणित पक्के करत उमेदवारी जाहीर केली आहे.

Rajya sabha elections : माजी महापौर मायाताई इवनाते होणार खासदार, भाजपचे धक्कातंत्र

महाराष्ट्रातून एकूण सात जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी चार जागांवर भाजपचा दावा मजबूत मानला जात आहे. कालच पक्षाने इतर राज्यांतील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र महाराष्ट्रातील नावांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज अधिकृत घोषणा करण्यात आल्याने प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला.

या उमेदवारीत सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेषतः रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना पुन्हा संधी देत अनुभवी नेतृत्वावर विश्वास दर्शवण्यात आला आहे, तर नव्या चेहऱ्यांनाही स्थान देत पक्षाने संघटनात्मक विस्ताराचा संदेश दिला आहे.

Rajyasabha election : शरद पवारांवरून पेच; उमेदवारी न दिल्यास भाजप पाचवा उमेदवार देणार?

आता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून महाराष्ट्रातील सात जागांपैकी अंतिम चित्र काय उभे राहते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.