Rajya sabha elections : मायाताई राज्यसभेवर, अग्निशमन समितीच्या सभापती आता कोण होणार?

Who-will-replace-mayatai-iwnate-as-Nagpur-municipal-corporation-fire-comittee-chairman:नगरसेवक पदाचा द्यावा लागणार राजीनामा, विशेष सभापतींची निवड आज

Nagpur माजी महापौर आणि महापालिकेच्या अग्निशमन समितीच्या विद्यमान सदस्य मायाताई इवनाते यांना भाजपने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. सोबतच त्यांना अग्निशमन समितीचे सभापती करण्याचे भाजपने ठरवले होते. त्यामुळे आता दुसरा सभापती निवडावा लागणार आहे.

विशेष म्हणजे उद्या गुरुवारी महापालिकेच्या १० विशेष सभापतींची निवडणूक आयोजित करण्यात आली आहे. त्यात अग्निशमन समितीचाही समावेश आहे. भाजपने ज्यांना समितीचे सभापती करायचे आहे त्यांची नावे पहिल्या क्रमांवर टाकली आहे.

Dr. Abhijeet chaudhari : अखेर नागपूर महापालिका आयुक्तांची पुण्यात बदली; गडकरी, ठाकरे, दटके यांनी केल्या होत्या तक्रारी

 

अग्निशमनच्या १० जणांच्या समितीच्या यादीत मायाताई इवनाते यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. हे बघता त्याच सभापती होणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र भाजपने मायाताई इवनाते यांना थेट राज्यसभेची उमेदवारी घोषित करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
मायाताई यांचा राजकीय प्रवासही असाच धक्कादायक सुरू झाला. २००७ मध्ये त्या महापौर झाल्या. मात्र ? पदासाठी भाजपच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार त्या नव्हत्या. भाजपने देवराव उमरेडकर यांना महापौर केले होते. ते अवघे दोन महिने महापौर होतो.

Vijay Wadettiwar : स्फोटकांच्या कारखान्यात दीड वर्षात ४३ कामगारांचा मृत्यू; काही करणार की नाही?

महापौर झाल्यानंतर उमरेडकर यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करता आले नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यामुळे भाजपने मायाताई इवनाते यांना महापौर केले. सुमारे अडीच वर्ष त्या महापौर होत्या. त्यानंतर मायाताई यांना भाजपने प्रदेश उपाध्यक्ष केले होते. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य होत्या.