Rajyasabha Elections : भाजप विदर्भातून राज्यसभेवर कोणाला पाठवणार? राणा, नेते यांच्या नावाची चर्चा

Ashok-nete-navneet-rana-in-race-for-rajyasabha-election : सर्वाधिक चुरस भाजपमध्ये, केंद्रीय नेतृत्वाकडे २५ नावांची यादी

Nagpur राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातून तीन खासदारांना आरामात निवडून पाठवू शकते एवढे आमदारांचे संख्याबळ भाजपकडे आहे. महाविकास आघाडीचे एक मत झाल्यास त्यांचाही एक खासदार होऊ शकतो. मात्र सर्वाधिक चुरस भाजपात सुरू आहे. पक्षाच्यावतीने २५ जणांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली आहे. यात अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा, गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते यांचा समावेश आहे. या दोन्ही इच्छुकांनी पक्षाकडे राज्यसभेसाठी विचार करावा अशी मागणी केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते पराभूत झाले आहेत. सध्या गडचिरोली महाराष्ट्र सरकारच्या अजेंड्यावर आहे. येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला स्टील सिटी करण्याचा संकल्प केला आहे. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध असतानाही भाजपने नवनीत राणा यांना पक्षात घेतले. लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र त्या पराभूत झाल्या. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा अपक्ष निवडून आल्या होत्या.

Iran israel war : जग हादरलं! इराणचा इस्रायलवर 105 क्षेपणास्त्रांचा मारा!

भाजपात जाण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते. मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याची हिंमत त्यांनी दाखवली होती. मात्र दिल्लीच्या नेत्यांनी त्यांना स्वीकारले मात्र भाजपचे स्थानिक नेते मात्र त्यांना अद्यापही आपले मानत नाही. अशा परिस्थिती पुन्हा निवडून येणे अवघड असल्याने नवनीत राणा यांनी राज्यसभेसाठी प्रयत्न चालवले असल्याचे कळते.