Claim that Somnath Suryavanshi was killed by the police : सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांकडून हत्या झाल्याचा दावा
Nagpur आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानूष मारहाणीमुळेच मृत्यू झाला आहे. पोलीस कोठडीमध्येच त्यांची हत्या झाली आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. या आरोपांसोबत आठवले यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह उभे केले आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
Wardha Drug traffickers : वर्धा जिल्ह्याला ड्रग्स तस्करांचा विळखा !
संविधानाच्या सन्मानासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर अमानूष पद्धतीने मारहाण करण्यात आली. पोलिसांवर या कृतीसाठी कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे रामदास आठवले एनडीए NDA मध्ये आहेत. ते स्वतः केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यामुळे महायुती सरकारसोबत थेट चर्चा करू शकतात. मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री फडणवीस यांच्याशीही ते संवाद साधू शकतात. पण त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Mahayuti Government : ५० लाखांच्या मागणीचा प्रस्ताव धूळखात !
केंद्रीय राज्यमंत्री आठवले रविवारी (दि. ४ जानेवारी) नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांना कुठलाही आजार नव्हता. पोलिसांच्या बेछुट मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आजार असल्याचा बनाव पोलीस करीत आहेत. सर्व पक्षांनी याविराेधात आंदोलन करायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. संविधानाच्या सन्मानासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस अशा प्रकारे मारहाण करीत असतील तर त्या पोलीसांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असं ते म्हणाले.
या प्रकरणातील आरोपी काही माथेफिरू नव्हता, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणाची विशेष चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
One Nation One Election एक देश एक इलेक्शन’ याची संविधानातच तरतूद आहे. सुरुवातीच्या काही निवडणुका तशाच पद्धतीने झाल्या. परंतु नंतर सत्ताधारी पक्षाचा पाठींबा काढण्याच्या घटनांनंतर ही पद्धत विस्कळीत झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या या बिलाला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठींबा आहे, असं आठवले यांनी स्पष्ट केलं.