Breaking

Ramdas kadam : तो ‘ डान्सबार ‘ नाही, तेथे लेडीज वेटर आणि ऑर्केस्ट्रा ची परवानगी !

Kadam says, an attempt to defame based on wrong rules : कदम म्हणतात, चुकीच्या नियमाचा आधार घेत बदनामीचा प्रयत्न

Mumbai : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावाने कांदिवलीत डान्स बार आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधिमंडळात केला. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. परब यांच्या आरोपानंतररामदास कदम यांनी कष्ट केले की, तो ‘ डान्सबार ‘ नाही, तेथे लेडीज वेटर आणि ऑर्केस्ट्रा ची परवानगी होती. तीस वर्षापासून होणार शेट्टीला चालवायला दिलेला आहे. आणि दोन महिन्यापूर्वी लेडीज वेटर आणि आर्केस्ट्रा ची परवानगी आम्ही रद्द केली आहे. तसेच हा बार दोन महिन्यापासून बंद आहे. असे सांगत त्यांनी परबांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

परब यांनी विधिमंडळाची दिशाभूल केली आहे. चुकीचे नियम सांगून त्यांनी योगेश कदम तसेच मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप कदम यांनी केला आहे. परब हे अर्धवट वकील आहेत. आपल्या मालकाला म्हणजेच, उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी हे केलं जातंय. रामदास कदम यांना कुठं बदमान करता येतं का? हा बालीश प्रयत्न विधिमंडळाचा आधार घेऊन चालू आहे. विधिमंडळ हे कायदेमंडळ आहे. हे विधिंमडळ नियमाने चालतं. अनिल परब यांनी सभागृहाची दिशाभूल केली. सभागृहाला चुकीची माहिती दिली. त्यांनी चुकीचे नियम दाखवले. त्यामुळे योग्य ती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना देणार आहे, अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली आहे.

Eknath Shinde : मी कोणाला छेडत नाही पण मला छेडलं तर सोडत नाही

सावली हा बार 1990 सालापासून चालू आहे. हा बार माझा पत्नीच्या नावेच आहे. व्यवसाय करण्यासाठी कोणाचीही कसलीच अडचण नाही. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही हा बार शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवायला दिला आहे. मला वाटतं 30 वर्षांमध्ये आम्ही तिथे पायही ठेवला नाही, असंही त्यांनी सांगितलं. त्या बारमध्ये 14 महिलांची वेटर म्हणून परवानगी आहे. तसेच तेथे ऑर्केस्ट्राचीही परवानगी आहे. तिथे डान्स बार चालत नाही. अनिल परब यांनी सावली हा डान्स बार आहे, असे सांगून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रामदास कदम यांनी केला.

Nishikant Dubey : मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली!

 

पोलिसांनी त्या बारच्या ठिकाणी पाहणी केली होती. त्या वेळी एका गिऱ्हाईकाने एका लेडीज वेटरवर पैशांची उधळण केली असे मला समजत आहे. म्हणूनच आम्ही ताबडतोड त्या शेट्टीला बाहेर काढले. त्यावर कारवाई केली. लेडिज वेटरचं लायसन्स होतं ते रद्द केलं. आम्ही ऑर्केस्ट्राचा परवानाही रद्द केला. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही ते हॉटेलही बंद केलं आहे, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली. तसेच माझ्या पत्नीला बदनाम करण्याचं काम केलं जातंय. त्याविरोधात मी कारवाई करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Uddhav Thackeray: समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं !

शिंदे गटाला 50 जागा मिळाल्या. हा जादुटोणा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली होती. त्यावर बोलताना ज्यांना काविळ होतो, त्यांना सगळे पिवळेच दिसते. ते मातोश्रीवर बसून जादुटोणाच करत असतील तर त्यांना सगळीकडे जादूच दिसेल. ते जेव्हा वर्षा बंगला सोडून गेले तेव्हा तिथे टोपलीभर लिंबं मिळाली. ते स्वत: जादूटोणाच करत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत, असा पलटावर रामदास कदम यांनी केला.

_____