Ram mandir temple administration allowed Shivsena for ramraksha recitation on conditions: संजय राऊत यांच्या लेखी पत्रानंतर मंदिर प्रशासनाची भूमिका
Nagpur शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात होणाऱ्या रामरक्षा पठण कार्यक्रमाला मंदिर प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. मंदिरात कोणताही राजकीय कार्यक्रम केला जाणार नाही, असे लेखी पत्र शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंदिर समितीला दिले आहे. सुरुवातीला हा राजकीय कार्यक्रम असण्याच्या शक्यतेमुळे मंदिर प्रशासनाने परवानगी नाकारली होती, मात्र संजय राऊत यांच्या लेखी आश्वासनानंतर प्रशासनाने हा निर्णय सकारात्मक दृष्टिकोनातून घेतला असल्याची माहिती रामनगर राम मंदिर समितीचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी दिली.
रवी वाघमारे यांनी स्पष्ट केले की, मंदिर प्रशासनाने संजय राऊत यांना मंदिरात कोणताही राजकीय कार्यक्रम करू नये, अशी विनंती केली होती. ही विनंती मान्य करत राऊत यांनी मंदिर समितीला पत्र सुपूर्द केले आहे.
Raj Thackeray : प्रश्न विचारणाऱ्यांना दाबण्याचा भाजपचा माज’, राज ठाकरेंचा निशाणा
या पत्रानुसार, शनिवारच्या कार्यक्रमात राम मंदिराच्या आत केवळ १५० प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण केले जाईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील. मात्र, शिवसेनेचा मुख्य सोहळा आणि नियोजित सभा ही मंदिर परिसराच्या बाहेर घेतली जाणार आहे. आम्ही धार्मिक कार्य करणारे आहोत आणि ते राजकीय कार्यक्रम करणारे आहेत, अशी ठाम भूमिका ट्रस्टने मांडली असून, मंदिराबाहेरील सभेची व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस आणि प्रशासनाची असेल, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut: कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी लुटीची जबाबदारी घ्यावी, संजय राऊतांचा थेट हल्ला
नागपूर शहरातून निघणाऱ्या दोन प्रमुख शोभायात्रांपैकी एक पोद्दारेश्वर राम मंदिरातून आणि दुसरी रामनगर राम मंदिरातून निघते. पोद्दारेश्वर मंदिर हे खाजगी असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असावी आणि म्हणूनच उद्धव सेनेने रामनगरच्या राम मंदिराची निवड केली असावी, असा अंदाजही मंदिर समितीने व्यक्त केला आहे. संजय राऊत यांच्या मध्यस्थीनंतर आता राम मंदिराच्या गाभाऱ्यात केवळ धार्मिक पठण होईल, तर मंदिराबाहेरील मैदानावर उद्धव सेनेचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.








