Farmers should receive a fair compensation for land acquisition : काटी पाटी बॅरेज संदर्भात लघुपाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना सूचना
Akola “शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये. शेतकरी हा देशाचा आत्मा असून जमिनीचे अधिग्रहण होताना त्याला योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांवर अन्याय होईल अशी भूमिका घेऊ नये,” अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
लघुपाटबंधारे विभाग, अकोला येथे काटी पाटी बॅरेज संदर्भात झालेल्या बैठकीत दोनवाडा आणि काटी पाटी परिसरातील शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. अधिग्रहित जमिनींच्या किमती शासकीय नियमानुसार निश्चित करण्यात आल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या मते त्या किमती अन्यायकारक व कमी आहेत. या बाबत आमदार सावरकर यांनी अधिकाऱ्यांना अवगत केले.
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार..!
त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकरी व ग्रामस्थांसह महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन अधिग्रहणासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, तसेच नियमानुसार योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळेल याची खबरदारी घ्यावी.
Reservation controversy : पवार गटाचे माजीमंत्री देशमुखांचा मराठा आरक्षण जीआरला विरोध !
याकरिता संबंधित अधिकाऱ्यांची महसूल विभाग, मुंबई येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार असून त्यांना वाढीव मोबदला मिळवून देऊ,” असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. या बैठकीस संतोष शिवरकर, राजेश बेले, अंबादास उमाळे, विवेक भरणे यांच्यासह काटी पाटी बॅरेज परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








