Rane and Thackeray : संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दार आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीही फरक नाही !

Nitesh Rane scathing attack on Thackeray brothers : नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर घणाघाती हल्लाबोल

Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विजयावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दारांमध्ये आणि राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यात काहीही फरक नाही, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.

मुंबई महापालिकेसह राज्यातील सुमारे 25 महापालिकांमध्ये भाजप विजयी झाल्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जयचंद ठरवत भाजपवर घणाघात केला होता. एकनाथ शिंदे गद्दार ठरले नसते, तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता, असा आरोप राऊत यांनी केला होता. याच वक्तव्यावरून नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Akola Municipal Corporation Elections : काठावरचा विजय ते दणदणीत मुसंडी!

माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत आणि ठाकरे गटाकडून सातत्याने अदानींच्या नावावरून मुंबई विकली जात असल्याचा अपप्रचार केला जातो. चंगेज मुलतानीच्या घशात घालणं चालतं, बुरखेवाली बनणं चालतं, पण अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होतोय, ते यांना चालत नाही. मुंबईचा विकास जो करू शकतो, त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. जिहाद्यांच्या घशात मुंबई घालण्यापेक्षा विकास करणाऱ्यांसोबत उभं राहणं आम्हाला मान्य आहे, असंही नितेश राणे म्हणाले.

एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर भाजपचा महापौर बसला नसता, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, हे स्वतः गद्दार नाहीत का. ज्या शिर्केने छत्रपती संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि संगमेश्वरला आमच्या छत्रपती संभाजीराजेंना पकडून दिलं, त्याच मानसिकतेचे लोक आज ठाकरे बंधू आणि त्यांची पिल्लावळ आहेत. त्यांच्यात आणि त्या गद्दारांमध्ये काहीही फरक नाही, असा आरोप त्यांनी केला.

Amravati Municipal Corporation Election : भाजपला धक्का, युवा स्वाभिमानची मुसंडी!

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट मुंबईत वाचून दाखवण्याचं काम ठाकरे गटाकडून केलं जात होतं. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या. त्यामुळे इतरांना नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही ज्यांची दाढी कुरवळत होता, त्यांनाच जाऊन उत्तर द्या, असा टोला त्यांनी लगावला.

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं असून आगामी काळात ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__