Breaking

Rashtriya Swayamsevak Sangh : संघ मुख्यालय परिसरात Camera Banned!

 

Camera banned in RSS headquarter area : पोलीस आयुक्तांचे आदेश; सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय

Nagpur संपूर्ण देशासाठी कुतुहलाचे केंद्र असलेल्या संघ मुख्यालय परिसरात आता कॅमेरावर बंदी जाहीर करण्यात आली आहे. या परिसरात कुणीही Photography, Video Shooting, Drone Shooting करू शकणार नाहीत. नागपूर पोलीस आयुक्तांनी Nagpur Police Commissioner यासंदर्भातील आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे अचानक अशाप्रकारचे आदेश काढण्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

महालसारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. या परिसरात ‘फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी’ किंवा ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्यास संघ मुख्यालयाच्या सुरक्षेबाबत धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संघ मुख्यालयाची सुरक्षा लक्षात घेता या परिसरात कॅमेराच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Centenary year of RSS : संघाच्या शताब्दी वर्षाचे प्लानिंग कर्नाटकमध्ये!

शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल Dr Ravinder Singal IPS यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. भारतभरात कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसंघाचे संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. विशेष म्हणजे, संघाचे मुख्यालय हे महाल सारख्या गजबजलेल्या ठिकाणी आहे. या परिसरात खासगी आस्थापना जसे हॉटेल्स, लॉज, शिकवणी वर्ग आदी आहेत. त्यामुळे संघ मुख्यालय व आजूबाजुच्या परिसरात व रत्यावर लोकांची सतत वर्दळ असते.

अशात कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, ड्रोनद्वारे चित्रीकरण, ड्रोनचा वापर केल्यास संघ मुख्यालयास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. सिंगल यांनी संघ मुख्यालय महाल व लगतचे रस्ते व सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध केला आहे. हा आदेश २६ फेब्रुवारी २०२५ ते २६ एप्रिल २०२५ पर्यंत लागू राहील.

RSS BJP : संघ दक्ष, बिहारकडे लक्ष!

रेकी झाल्यानंतर हल्ला
जवळपास वीस वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पोलिसांना गुप्तचर यंत्रणेद्वारे माहिती मिळाली होती. त्यामुळे सर्व हल्लेखोरांना जागीच ठार करण्यात आले. त्यापूर्वी या दहशतवाद्यांनी मुख्यालयाची रेकी केली होती. पाच वर्षांपूर्वी अशाचप्रकारे दोघांना रेकी करून फोटो काढताना पोलिसांनी पकडले होते. त्यामुळे भविष्यात असा प्रकार होऊ नये म्हणून काळजी घेतली असावी, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.