Ravi Rana on Water crisis : तर मलाही आमदार म्हणून खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही!

Water planning failed, demand for action against officials : रवी राणा यांचा संताप; पाण्याचे नियोजन फसले, आमदारांनी अधिकाऱ्यांना फटकारले

Amravati नागरिकांसाठी जलवाहिन्यांचे जाळे आणि घराघरात नळ कनेक्शन असूनही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसेल, तर अधिकाऱ्यांना आणि मलाही आमदार म्हणून खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही,” असे आमदार राणांनी स्पष्टपणे सांगितले.

सिंभोरा धरणात मुबलक पाणीसाठा असूनही अमरावती व बडनेरा शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, ही लाजीरवाणी बाब आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन ढासळले असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली.

Krantikari Shetkari Sanghatna : कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी उगारले आंदोलनाचे अस्त्र!

शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजिप्रा) Maharashtra Jeevan Pradhikaran कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या थेट नागरिकांकडून जाणून घेतल्या. नियोजनाअभावी नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासत असल्याने आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहता कामचुकार अभियंता मोरेश्वर आजणे यांना थेट बैठकीतून बाहेर काढण्यात आले.

“सिंभोरा प्रकल्पासाठी ९५० कोटी आणि विस्तारित पाणीपुरवठा जलवाहिनीसाठी ८ कोटी रुपये खर्चून सहा जलकुंभांची निर्मिती करण्यात आली. उद्योग आणि शेतीसाठी राखीव पाण्याचा अत्यल्प वापर होतो,’ असंही ते म्हणाले. पाणी चोरी रोखण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शनवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचनाही आमदारांनी यंत्रणेला दिल्या. यापुढे अशा दुर्लक्षित कारभारास सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले.

Akola Industrial Development : गुंतवणूक परिषद ठरली ‘मास्टर स्ट्रोक’!

या बैठकीस मजिप्राचे प्रभारी मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर, कार्यकारी अभियंता विवेक सोळंके, उपकार्यकारी अभियंता संजय लेवरकर, १०५ गाव पाणीपुरवठा योजनेचे उपकार्यकारी अभियंता विजय लोखंडे, शाखा अभियंता मोरेश्वर आजणे, वाकेकर, आखरे, काटे, खान आदी अधिकारी उपस्थित होते.