Breaking

Ravikant Tupkar : सुडबुध्दीच्या राजकारणातून शेतकरी चळवळीवर आघात ?

 

Attack on the farmer movement through politics of common sense : प्रतापराव जाधवांनी पोलिसांवर दबाव टाकून जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर टालेंना केले तडीपार

Buldhana : बुलढाणा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मोठे जनसमर्थन मिळाले. त्यामुळे विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव अस्वस्थ झाले असल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही तुपकर यांचे प्रभावी काम पाहता त्यांच्यासह शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या दबावातून क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्‍वर टाले यांना पोलिस प्रशासने तडीपार केले असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर डॉ. टाले सक्रिय आहेत. आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले असले तरी ते गंभीर स्वरूपाचे नाहीत. मात्र, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या राजकीय हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो, या भीतीतून डॉ. टाले यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

Prataprao Jadhav : एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत मैत्री कायम ठेवून पक्षाची विचारसरणी जपली !

सराईत गुन्हेगार मोकाट, कार्यकर्ते मात्र तडीपार..
बुलढाणा जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले सराईत गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत. तर केवळ आंदोलने केल्यामुळे शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना तडीपार केले जात आहे. ही कारवाई राजकीय द्वेषातून झाल्याचा आरोप करत, शेतकरी संघटनेने याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

लोकसभेचा बदला घेतला जातोय..
“लोकसभा निवडणुकीत डॉ. ज्ञानेश्‍वर टाले यांनी माझ्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली. त्यांनी झोकून देऊन काम केले. त्यामुळेच मेहकर विधानसभा मतदारसंघात मला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले. त्याचाच राग मनात धरून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलिस प्रशासनाला हाताशी धरून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई लादली,” असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Nitin Gadkari : गडकरींना भेटून पाणावले डोळे!

या संपूर्ण घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी राज्यभरात शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्याची तयारी सुरू केली आहे.