Anger against the company for providing meager crop insurance compensation : संतप्त आमदाराने दिला आंदोलनाचा इशारा, मंत्रालयात निवेदन
Buldhana २०२४ च्या पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी त्यातील तुटपुंज्या रकमा आणि मनमानी निकषांवर शेतकरी संतापले आहेत. काहींच्या खात्यात १९, २४, ७४, ९० किंवा १०० रुपये इतकीच रक्कम जमा झाल्याने हा प्रकार शेतकऱ्यांचा अपमान आहे. एआयसी कृषी विमा कंपनी शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे का, असा सवाल करण्यात येत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी तुपकरांनी स्पष्ट इशारा दिला की, प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास आक्रमक आंदोलन उभारले जाईल.
Water crisis : रस्ता व पाणीप्रश्नावर बेलुरा ग्रामस्थांचा हंडा बजाव आंदोलन
एका शेतकऱ्याला भरीव नुकसानभरपाई देण्यात आली, तर त्याच्याच शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्याला ५० ते १०० रुपयांदरम्यानची रक्कम मिळाली, हा प्रकार अन्यायकारक आणि संतापजनक असल्याचे तुपकर म्हणाले.
पंचनाम्याच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप करताना त्यांनी सांगितले की, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, सरपंच व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांशिवाय एआयसी कंपनीच्या प्रतिनिधींनी पंचनामे भरले. हे फॉर्म कृषी विभागाला व शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही कंपनी टाळाटाळ करत आहे.
तुपकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की, पंचनाम्याचे सर्वे फॉर्म समोर आले तर कंपनीचे गैरकारभार उघड होईल. म्हणूनच ते फॉर्म जाणीवपूर्वक लपवले जात आहेत. “ज्या शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम मिळाली आहे त्यांना भरीव मदत द्या, अन्यथा कृषी विभाग आणि एआयसी कंपनीला तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल,” असा कडक इशारा तुपकरांनी दिला.
Reservation controversy : बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, १५ सप्टेंबरला महामोर्चा
शेतकऱ्यांना नियम व निकष समान असताना कंपनीने मनमानी पद्धतीचे निकष लागू करून हजारो शेतकऱ्यांना योग्य मोबदल्यापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.








