Ravindra Chavhan : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वाहनावर सोयाबीन फेकण्याचा प्रयत्न

Attempt to throw soybeans at the vehicle of the BJP State President : अमरावतीत भाजप-काँग्रेस आमने-सामने, पंचवटी चौकात तणाव

Amravati शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे शुक्रवारी सकाळी शहरात आगमन झाले. पंचवटी चौकात त्यांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, अमरावती तालुका काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते तहसील कार्यालयाजवळ एकत्र आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाण यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या वाहनांवर सोयाबीन फेकण्याचा प्रकार घडवून आणला, तर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रदेशाध्यक्षांचे जल्लोषात स्वागत केले.

Prahar Janshakti Party : शेतकऱ्यांचा अंत बघू नका, ओला दुष्काळ जाहीर करा

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने असल्याने पंचवटी चौकात तगडा पोलिस बंदोबस्त होता. या घडामोडींमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

Zilla Parishad : पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा क्लास

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “प्रदेशाध्यक्षांचे वाहन अडवणे, सोयाबीन फेकणे ही कृती योग्य नाही. जे कार्यकर्ते या प्रकारात सहभागी झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांना निर्देश देणार आहे. निवेदन घ्यायला बोलावले असते तर मी आलो असतो.”