pune-bjp-69-rebels-suspended-six-years-amol-balwadkar : पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढणे लढणे भोवले
Pune : पुण्यातील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवणारी कारवाई भारतीय जनता पक्षाने केली असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या 69 कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली असून, नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
निवडणुकीदरम्यान पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून अर्ज दाखल केले होते. या कृतीला पक्षशिस्तीचा गंभीर भंग मानत भाजपने कोणतीही तडजोड न करता थेट निलंबनाची कारवाई केली आहे. या निर्णयानुसार संबंधित 69 जणांना पुढील सहा वर्षे पक्षाच्या कोणत्याही संघटनात्मक उपक्रमात सहभागी होता येणार नाही तसेच त्यांना कोणतेही पद किंवा जबाबदारी देण्यात येणार नाही.
Sharad pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती!
या कारवाईत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यासह अनेक परिचित स्थानिक नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पक्षशिस्तीबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा ठाम संदेश भाजप नेतृत्वाने या माध्यमातून दिला आहे. भविष्यात कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्याच्यावरही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही शहर व जिल्हा पातळीवरील नेतृत्वाकडून देण्यात आला आहे.
या संदर्भातील अधिकृत पत्रही समोर आले असून त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्वाक्षरी आहे. पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढविल्यामुळे संबंधित कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात येत आहे आणि ही कार्यवाही तात्काळ लागू करण्यात येत आहे.
भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या 69 जणांमध्ये धनंजय जाधव, चंद्रकांत पाटे, कादंबरी साळवी, जितेंद्र टकले, किशोर तरवडे, अमोल बालवडकर, सोमनाथ गुंड, मानसी सोमनाथ गुंड, अनिता तळाठी, पल्लवी गाडगीळ, दत्ता भगत, विनोद मोहिते, रमेश भंडारी, समाधान शिंदे, मधुकर मुसळे, प्रकाश डोरे, बाळासाहेब सानवडे, मंजू वाघमारे, प्रीती वालकर, संदीप लोणकर, स्मिता गायकवाड, संतोष शिंदे, युवराज कुञ्जेकर, इफ्तियाज मोमीन, अप्पणा दादावाडकर, पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर, अभिजीत उपाध्ये, छाया गवळी, नवल कुसाळ, समीर पठाण, प्रणव मोरे, योगेश सूर्यवंशी, अर्चना योगेश सूर्यवंशी, नलिनी मोरे, संगिता ठोसर, अनिल मेमाणे, नितीन मारकड, सतीश मारकड, वर्षा मारकड, रुपेश धुले, बापू पोकळे, किरण वाळुंज, अमोल रायकर, संदीप पोकळे, मोहिनी देवकर, रितेश रासकर, सचिन दशरथ दांगट, सुरेंद्र कांबळे, संदीप जन्हाड, सुनीता गलांडे, किशोर वाघमारे, विजय चौगुले, अकबर पठाण, राजू साखरे, ऐश्वर्या जाधव, जितेंद्र जगताप, प्रविण खेडकर, स्मिता खेडकर, उज्वला गोडे, बाळासाहेब घोडके, सुरेश धनगर, स्वाती धनगर, सुवर्णा भरेकर, पल्लवी केदारी, राहुल रामे, हरीष परदेशी, बंडू जाधव, नीता थोरवे आणि प्रीतम नागापुरे यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक शिस्त अधिक कडक करण्याचा स्पष्ट संकेत दिला असून, पुण्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








