Transport Minister Pratap Sarnaik’s appeal to travel companies for the common man : सर्वसामान्य प्रवाशांची कमी खर्चात होईल व्यवस्था
Mumbai : सुखवस्तू घरांतील लोक नित्यनेमाने देवदर्शनाला, पर्यटनाला जातात. पण गोरगरीब जनतेला इच्छा असूनही ते शक्य होत नाही. याचा विचार आता राज्य सरकारने केला आहे. सर्वसामान्य लोकांनाही धार्मिक स्थळांना भेटी देता याव्या, यासाठी खासगी जुर्स अॅंड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एकटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित कराव्या, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांना केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले, सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेचा आनंद लुटता आला पाहिजे, त्यासाठी या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अॅंड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे. या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या मुख्यालयात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सर्व खातेप्रमुख यांच्यासह खासगी टूर्स अॅंड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशावेळी एसटीने खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटन स्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनचा आनंद लुटता येईल, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
Student passes : आता एसटीच्या पासेससाठी होणार नाही विद्यार्थ्यांची पायपीट !
खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन , तुळजापूर- पंढरपूर -अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर -नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. तथापि,या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावी, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.