Big change in NCP, Mitkari’s suggestive reaction through poetry : राष्ट्रवादीत मोठा बदल, मिटकरींची शायरीतून सूचक प्रतिक्रिया
Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा फेरबदल करण्यात आला असून, पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे व यांची नावे वगळण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17 सदस्यीय नव्या प्रवक्ते यादीतून दोन्ही नेत्यांची नावे गायब असल्याने, पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचं स्पष्ट होतं. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण झाला आहे.
प्रवक्तेपदावरून वगळल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं होतं. तर अमोल मिटकरी यांनी शायरीच्या माध्यमातून शांत पण सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवरून त्यांनी लिहिलं – “दुनिया दौड़नेवालों की है, लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है!” — म्हणजेच संयम ठेवणाऱ्यांनाच खरे ध्येय गाठता येते, असा अर्थ त्यांच्या शायरीतून दिसून येतो.
Land scam in Pune’s Koregaon : मुंडवा जमीन व्यवहार रद्द करण्याची अमेडिया ची तयारी, पण…
अमोल मिटकरी यांच्या सोशल मीडियावरील काही भूमिका आणि ट्विट्समुळे पक्षाला तसेच महायुतीला वेळोवेळी अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना अनेकदा आपली भूमिका मागे घ्यावी लागली. फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणावर रुपाली ठोंबरे यांनी आपल्या पक्षातील नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि नंतर अजित पवार यांच्या भेटीनंतर काही तासांतच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
या यादीतून केवळ अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरेच नव्हे तर वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांनाही वगळण्यात आलं आहे. या हालचालींमागे राष्ट्रवादीत शिस्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
अमोल मिटकरी यांची वादग्रस्त ठरलेली वक्तव्ये आणि ट्विट्स हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या जातपडताळणीची मागणी करणारे ट्विट केलं होतं, जे पक्षाच्या दबावामुळे नंतर डिलीट करावं लागलं. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांनी अप्रत्यक्ष समर्थन दिलं, ज्यावरून पक्षात नाराजी पसरली. तसेच, राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया टीमच्या व्यवस्थापनावरही त्यांनी खुलेपणाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
Congress : काँग्रेसला कमकुवत करण्यात शरद पवारांसह विरोधी पक्षांची भूमिका !
याशिवाय, महायुतीत असताना रावणाचं मंदिर बांधणार असल्याची घोषणा आणि अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानावरून केलेलं ट्विट या सर्व घटनांमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाव न घेता “वाचाळवीरांना पक्ष नेतृत्वाने समज द्यावी” असा सल्ला दिला होता, जो मिटकरींकडेच निर्देशित असल्याचं मानलं जातं.
राष्ट्रवादीच्या नव्या यादीतून या हटवण्यात आलेल्या नावांमुळे पक्षात नव्या प्रवक्त्यांसाठी जागा मोकळी झाली असून, अजित पवार गटाने संघटनात्मक शिस्त आणि सुसंवादावर भर देण्याचे संकेत दिले आहेत.
________








