Chief Minister Devendra Fadnaviss confidence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Pune : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने काढलेला निर्णय ओबीसी समाजावर गदा आणणारा नाही, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. “ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. याची पूर्ण काळजी त्या जीआरमध्ये घेतली आहे,” असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
फडणवीस यांनी सांगितले की, “ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल. ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. कुणीही विनाकारण घुसखोरी करू शकणार नाही.”
Waqf Amendment Act 2025 : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !
मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही समाजांतील गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. “खरी परिस्थिती समाजापर्यंत पोहोचवली नाही, तर तेढ कमी होणार नाही. आम्ही स्पष्ट सांगतो की जीआरमध्ये अशा तरतुदी आहेत की ज्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत त्यांनाच लाभ मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्राध्यापक पदांच्या भरतीवरून निर्माण झालेल्या अडचणींवरही त्यांनी भाष्य केले. राज्यपालांच्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली असून लवकरच ८० टक्के रिक्त पदे भरली जातील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे मराठा–ओबीसी आरक्षण प्रश्नातील तणाव शमण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








