Rising Mining Activities : माओवाद आटोक्यात, पण पर्यावरणाचे काय ?

Maoism Contained in Gadchiroli, But at What Cost to the Environment : आदिवासींचे जीवनही होतेय प्रभावित

 

Nagpur : गडचिरोली जिल्ह्यात सरकारने माओवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. माओवाद्यांच्या कारवायांवर जवळपास नियंत्रण मिळवले. अनेकांना यमदसनी धाडले, तर अनेक माओवादी शरण आले. त्यानंतर शासनाने येथे मायनिंग कंपन्यांना प्रवेश दिला. आता येथे मायनिंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासींचे जीवनही धोक्यात आले आहे.

सुरजागड खाणीमध्ये लॉयड कंपनीकडून प्रचंड खोदकाम केले जात आहे. त्याचा परिणाम आदिवासींच्या जीवनावर होतो आहे. स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे वचन लॉयड कंपनीने दिले होते, पण त्यांचे वचन खोटे ठरत आहे. आदिवासींना रोजगार देण्याच्या नावाखाली जंगलांना नष्ट करून खाणीचे काम वाढवले जात आहे. स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या नावाखाली सिक्युरीटी गार्डसारखी निम्न दर्जाची कामे दिली जात आहेत. काही लोकांना तर रस्त्यांवरून जनावरे हाकलण्याचे काम दिले जात आहे. जेणेकरून कंपनीची मालवाहतूक प्रभावित होणार नाही. येवढी मोठी खाण सुरू करून जिल्ह्याचा हाच विकास आहे का, असा सवाल स्थानिक आदिवासी लोकांकडून उपस्थित केला जात आहे.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटलांच्या नाराजीची चर्चा

जिल्ह्यातील आदीवासी कमी शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना खानसामा, चहा वाटणे, साफसफाई, शौचालये साफ करणे आदी लहानसहान कामे दिली जात आहेत. सिक्युरीटी गार्डला महिन्याचे आठ ते नऊ हजार रुपये वेतन दिले जात आहे. हे म्हणजे २०० ते ३०० रुपये प्रतिदिन पैसे दिले जातात. हे तर वेतन नियमांचे उल्लंघन आहे. आदिवासी लोक जंगलातून तेंदुपत्ता गोळा करणे, बांबू कापून आणणे, लाकडं आणणे ही कामे करतात. तर कुणी शेतीही करतात. यांतून त्यांना लॉयड कंपनीच्या पगारापेक्षा जास्त पैसै मिळतात. त्यामुळे आम्हाला लॉयड कंपनीच्या रोजगारातून काहीही वेगळे मिळत नाही. त्यापेक्षा आमचा पारंपरिक रोजगारच बरा, अशी भावना आदीवासींची झाली आहे. त्यामुळे लॉयड कंपनीला सुरजागड खाणीत खोदकाम करू देणे यामागे कंपनी आणि सरकारमधील लोकांचेच भले होणार आहे. आम्हाला त्याचा काहीही फायदा नाही, असे आदिवासींचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉयड कंपनीला येथून हद्दपार करण्याची मागणी जोर धरत आहे.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.