Rohit Pawar : रोहित पवारांचा प्रश्न ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ कुठे आहेत?

Terror of criminal gangs, bloody Holi in front of police : गुन्हेगारी टोळ्यांची दहशत पोलिसांच्या नाकावर टिच्चून रक्तरंजित होळी

Pune : पुणे शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीने डोके वर काढले आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठ परिसरात उघड्यावर गोळ्या झाडून आयुष कोमकरचा खून करण्यात आला. या रक्तरंजित घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीचा आधारस्तंभ आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी होता. आता त्याचा मुलगा आयुष कोमकर हा टोळीयुद्धात बळी पडला. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला, रूट मार्च काढला. पण त्याच दिवशी काही तासांतच टोळक्यांनी उघड्यावर धाडसाने गोळीबार करत आयुषचा खून केला. यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यातील सर्वात मोठी अपडेट !

लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना अशा प्रकारचा रक्तरंजित प्रकार घडल्याने नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याचा मध्यवर्ती भाग पोलिसांच्या कडक निगराणीखाली असतानाही टोळक्यांनी बेधडकपणे गोळ्या झाडल्याने सुरक्षा यंत्रणांची धडकी भरली आहे. सामान्य नागरिक जीव मुठीत धरून बसले आहेत.

Threat to officer : अजित पवार, अंजना कृष्णा वाद चिघळला

या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला. समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे,
“लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो. एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुण्यात रक्तरंजित होळी खेळली जाते. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय. अशा परिस्थितीत लोक विचारत आहेत, कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’?”

Tribhasha Sutra : वादग्रस्त त्रिभाषा सूत्र ठरवण्यासाठी हालचाली

गणेश विसर्जनाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या दक्षतेवर शंका उपस्थित झाली आहे. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करूनही टोळीयुद्ध घडले, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली आहे. मात्र, अशा घटना थांबवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

पुण्याच्या प्रतिष्ठेला डाग लावणारी ही घटना असून, यामुळे आगामी दिवसांत राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठे वादळ उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

____