व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Threat to officer : अजित पवार, अंजना कृष्णा वाद चिघळला

Threat to officer : अजित पवार, अंजना कृष्णा वाद चिघळला

Mitkaris letter raises possibility of investigation : मिटकरींच्या पत्रामुळे चौकशीची शक्यता !

Mumbai: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील वाद आता आणखी गडद होत चालला आहे. कुडेवाडीतील अवैध उत्खनन प्रकरणातून सुरू झालेला हा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे थेट तक्रार दाखल झाली आहे.

या वादाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील कुडेवाडी येथे झाली. अवैध मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी अंजना कृष्णा कारवाई करत असताना राष्ट्रवादी कार्यकर्ता बाबा जगताप यांनी अजित पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यानंतर दादांनी महिला अधिकाऱ्यांना थेट आदेश देत कारवाई थांबवण्याचे सांगितले. आदेश न मानल्यास कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र अंजना कृष्णा यांनी आपली ओळख द्यावी अशी मागणी केली आणि कारवाई सुरू ठेवली. यावेळी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रकरणाला मोठे राजकीय वादळ उठले.

Tribhasha Sutra : वादग्रस्त त्रिभाषा सूत्र ठरवण्यासाठी हालचाली

या घटनेनंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांनी महिला अधिकाऱ्यांबाबत दादागिरी केल्याचा आरोप केला. तर दादांनी स्वतःच यावर स्पष्टीकरण देत महिलांविषयी सर्वोच्च आदर असल्याचा दावा केला आणि मुरूम उत्खननात तणाव वाढू नये म्हणून हस्तक्षेप केला, असे सांगितले. रोहित पवार यांनीसुद्धा दादांवर मित्रपक्षच अडचण निर्माण करत असल्याचे टोला लगावला.

Bacchu Kadu : शेतकऱ्यांची लूटवापसी संवाद सभा १९ सप्टेंबरला अकोल्यात

दरम्यान, राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. मिटकरी यांनी 5 सप्टेंबर रोजी यूपीएससी सचिवांना पत्र लिहून अंजना कृष्णा यांनी सेवेत दाखल होताना सादर केलेल्या शैक्षणिक, जात आणि इतर दस्तावेजांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या सर्व कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक असून या प्रक्रियेत पारदर्शकता दिसली पाहिजे, असे मत मिटकरींनी मांडले.

आता यूपीएससी या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. अजित पवार – अंजना कृष्णा यांच्यातील वादामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे राजकीय वातावरण तापले आहे आणि आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

___

error: Content is protected !!