RPI Ramdas Athavle : रिपाइं (आठवले)च्या बैठकीत खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या!

Clashes in district president election; riot control team reached the spot : जिल्हाध्यक्ष निवडीत तुफान राडा; दंगल नियंत्रक पथक पोहोचले

Buldhana रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत विश्राम भवन येथे तुफान गोंधळ उसळला. इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या गटात प्रथम नारेबाजी आणि वादावादी झाली; त्यानंतर हातघाईला जात खुर्च्या, कुंड्या भिरकावल्या गेल्या. अखेर पोलिसांसह दंगाकाबू पथकाला पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

या बैठकीत जिल्हाध्यक्षपदासाठी दिलीप खरात, भैय्यासाहेब पाटील, बाबासाहेब जाधव, विजय साबळे, विजय मोरे, संजय वाकोडे, विजय पवार, शरद खरात यांच्यासह काही अन्य इच्छुकांनी आपापले दावे सादर केले. परंतु, मते मांडतानाच गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर धाव घेताच हाणामारी सुरू झाली आणि वातावरण पूर्णतः बेकाबू झाले.

Ravikant Tupkar : माझे फोन टॅप होत आहेत, मी सरकारच्या नजरकैदेत

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दंगाकाबू पथकाच्या मदतीने कार्यकर्त्यांना बाहेर काढून वातावरण शांत करण्यात आले. त्यानंतर पक्ष निरीक्षक बाबुराव कदम आणि सुधाकर तायडे यांनी पुन्हा बैठक घेऊन सर्वांची मते ऐकून घेतली. मात्र, अंतिम निर्णय न घेता ते निवड प्रक्रियेबाबतचा अहवाल उच्च नेतृत्वाकडे सोपवून निघून गेले.

Makrand Patil : १.८० लाख शेतकऱ्यांना मिळणार १२१ काेटींची मदत

या गोंधळामुळे जिल्हाध्यक्ष पद निवडीचे सर्वाधिकार आता थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. या घटनेला गालबोट लावणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पक्ष नेतृत्व काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.