Breaking

Sandip Joshi : महापालिकेची निवडणूक भाजपर एकतर्फी जिंकणार, संदीप जोशींचा दावा

BJP confident of unilateral victory in Nagpur municipal elections : चौफेर विकास गेम चेंजर ठरणार, १२० जागा जिंकण्याचा विश्वास

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या Nagpur municipal corporation निवडणुकीत एकतर्फी सामना होणार असल्याचा दावा विधानपरिषद आमदार संदीप जोशी यांनी केला आहे. या एकतर्फी सामन्यात भाजपचं पारडं जड राहील आणि १२० जागा जिंकून आम्ही वर्चस्व कायम ठेवू, असा दावा जोशींनी केला आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने १०८ जागा जिंकल्या होत्या, हे विशेष.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्या नेतृत्वात भाजप ही निवडणूक लढणार आहे. गेल्या काही वर्षांत गडकरी व फडणवीस यांच्या नेतृत्वात शहराचा चौफेर विकास झाला आहे. हा विकासच गेम चेंजर ठरणार असल्याचा दावा जोशींनी केला आहे.

Dnyaneshwar Dhane Patil : दोनवेळा आमदार होते, आता ठाकरेंची साथ सोडली

प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने मंगळवारी जारी केले आहेत. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेची निवडणूक २०१७ प्रमाणे चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. महाराष्ट्रातील ‘अ, ब, क’ वर्ग महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागरचना तातडीने सुरू करण्याचा हा आदेश आहे. त्यानुसार २०२५ मध्ये होणारी नागपूर महापालिकेची निवडणूक २०१७ च्या चारसदस्यीय प्रभागरचनेनुसारच होणार आहे. त्यामुळे सदस्य संख्याही १५१ कायम राहणार आहे.

वाढीव लोकसंख्येच्या आधारावर नव्याने प्रभागरचना व आरक्षण काढले जाणार आहे. २०१७ मध्ये झालेली महापालिकेची प्रभागरचना ही २००१ च्या जनगणनेच्या आधारावर करण्यात आली होती. त्यानुसार ३८ प्रभागांत १५१ सदस्य होते. आता होणारी प्रभागरचना ही २०११ च्या जनगणनेच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे प्रभागांची संख्या व सदस्य संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत.

महाविकास आघाडी सरकारने प्रभागरचना तीनसदस्यीय करून सदस्यांची संख्या १५१ वरून १५६ केली होती. मात्र, या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. पुढे तब्बल अडीच वर्षे महापालिकेची निवडणूक झाली नाही. आता चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असून, सदस्य संख्या १५१ एवढीच राहण्याची शक्यता आहे.

Eknath shinde : ही टोमणेसम्राटांची नव्हे तर हिंदुह्रदयसम्राटांची शिवसेना

नागपूर महापालिकेल्या गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये दमदार विजय मिळवून भाजप सत्तेत आहे. गेल्यावेळी चारसदस्यीय प्रभागरचनेचा भाजपला मोठा फायदा झाला होता. यावेळी राज्यात आणि केंद्रातील सत्तेचा किती परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल. तर महाविकास आघाडीला देखील मोठ्या यशाची खात्री आहे.