Sandip Joshi : देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ स्वप्नं २५ वर्षांनंतर झालं साकार !

Devendra Fadnavis’ ‘dreams’ came true after 25 years : ‘सेवा हाच धर्म’ ही भूमिका प्रत्यक्षात उतरवली

Nagpur : गरीब आणि गरजू नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा नाममात्र दरांत उपलब्ध करून देण्यासाठी नागपुरात गंगाधरराव फडणवीस मेमोरियलच्या माध्यमातून गंगाधरराव फडणवीस डायग्नोसीस सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हे स्वप्नं पाहिलं होतं, ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे, असे भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना आमदार जोशी म्हणाले की, या डागय्नोसिस सेंटरमुळे आता नागपूर आणि आसपासच्या भागातील रुग्णांना केवळ २१०० रुपयांच एमआरआयसारखी महागडी चाचणी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे केंद्र अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज आहे. यामध्ये दोन एमआरआय मशीन्स, दोन सीटी स्कॅन मशीन्स, दोन सोनोग्राफी मशीन्स, एक एक्स रे मशी आणि तब्बल २५ डायलिसीस युनिट बसवण्यात आले आहेत. याशिवाय आधुनिक पॅथॉलॉजी लॅबदेखील या केंद्रात सुरू करण्यात आली आहे.

New CJI : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार न्यायमूर्ती सूर्यकांत

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या डायग्नोसिस सेंटरचा उद्देश आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा आहे. आर्थिक मर्यादांमुळे अनेक वेळा गरीब लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत. हे केंद्र त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरेल आणि नागपूरसह विदर्भात आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय सुरू करेल. गंगाधरराव फडणवीस यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेत या केंद्राच्या माध्यमातून ‘सेवा हाच धर्म’ ही भूमिका प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आहे.

Doctor suicide case : फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणात धक्कादायक वळण

या केंद्रात सेवा सुरू झाल्या असून आता दररोज शेकडो रुग्णांना अल्प दरांत चाचण्या व उपचारांची सुविधा मिळणार आहे. नागपूरच्या आरोग्य क्षेत्रात ही एक ऐतिहासिक पायरी मानली जात आहे. या उपक्रमामुळे गरीब रुग्णांना दिलास मिळणार असून गंगाधरराव फडणवीस यांच्या स्मृतींना खरे अभिवादन ठरणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.3