Sangram Kote Patil : संग्राम कोते पाटलांना डावलल्यामुळे राष्ट्रवादीमधील युवा दुखावला का ?

 

Did Ajit Dada miss the opportunity to connect the youth by ignoring Sangram Kote Patil? : दादांनी ऐन वेळेवर सर्वांनाच शॉक दिला, अन् अमरावतीचे संजय खोडके यांचे नाव घोषीत केले

Nagpur : विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्चला निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, हे जवळपास निश्चित आहे. यामध्ये अजित पवार यांच्या वाट्याला एक जागा आली आणि या जागेवर त्यांनी अमरावतीचे संजय खोडके यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला. प्रमुख दावेदार असलेले दादांचे निकटतम सहकारी शिर्डीचे संग्राम कोते पाटील यांच्या वाट्याला पुन्हा प्रतीक्षा आली. कोते पाटलांना संधी नाकारून राज्यातील युवा वर्ग अजित दादांपासून दुरावेल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

विधानपरिषेची निवडणूक घोषीत झाली तेव्हा संग्राम कोते पाटलांचे नाव नंबर एकवर होते. त्यांच्या निवडीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे युवा वर्ग आणखी मोठ्या संख्येने येईल, याची खात्री दिली जात होती. सर्व संघटनांच्या लोकांनी कोते पाटलांना पाठींबा दिला होता. अजित पवार यांचे बव्हंशी मंत्री, आमदार, विद्यार्थी आदी सर्वांनी कोते पाटलांसाठी दादांना ढिगाने पत्र पाठवले. असे असताना दादांनी ऐन वेळेवर सर्वांनाच शॉक दिला. अन् अमरावतीचे संजय खोडके यांचे नाव घोषीत केले. खोडके यांच्या पत्नी सुलभा या अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे एकाच घरात दोन आमदार कशाला, असाही प्रश्न अनेकांना पडल्यावाचून राहिला नाही.

Ajit Pawar : २० टाळकी असताना पाठींबा कसला देताय ? दादांनी उडवली खिल्ली

साडेतीन लाख किलोमीटर प्रवास..
मुळचे शिर्डीचे संग्राम कोते पाटील हे अजित पवार यांचे निकटस्थ मानले जातात. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष राहून चुकलेले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. पक्षासाठी त्यांनी युवक, विद्यार्थ्यांची मोठी फळी निर्माण केली. यासाठी सन २०१४ ते २०२० या काळात त्यांनी राज्यभर जवळपास साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला. राज्यातील युवा वर्गाला पक्षाकडे आकर्षीत करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.

Ajit Pawar : यांना अरे म्हणता येत असेल, तर मलाही कारे म्हणता येतं !

आंदोलक चेहरा..
कोते पाटील यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात राज्यभर तब्बल १२४ मोर्चे काढले. या मोर्चांच्या माध्यमातून पाच लाखांपेक्षा अधिक युवा त्यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरला. त्याचा पक्षाला चांगलाच फायदा झाला. त्यांच्या कार्यकाळात राज्यस्तरीय मेळावे, शिबिरे, बूथ कमिटी बांधणी आदी कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आंदोलक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांच्याशी असलेली जवळीक बघता विधानपरिषद सदस्यपदी संग्राम कोते पाटील यांची वर्णी लागेल, अशी पूर्ण खात्री असताना अजित दादांनी सर्वांनाच ‘जोर का झटका धिरे से..’ दिला. शेवटी काय तर.. राजकारण आणि क्रिकेटमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, सांगता येत नाही, हेच खरे.