Sanjay Gaikwad : ‘पैसे मागणाऱ्यांची खैर गय नाही’; आमदाराचा अधिकाऱ्यांना इशारा

Officials warned of action after housing scheme scam : घरकुल घोटाळ्यावर प्रधान सचिव डवले यांच्याशी चर्चा

Motala प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी थेट झडती घेत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. पंचायत समिती मोताळा येथे झालेल्या ‘घरकुल तक्रार निवारण सभेत’ त्यांनी स्पष्ट इशारा दिला
“गोरगरीबांचे घरकुलाचे स्वप्न साकार होऊ द्या… पण जर पुन्हा पैशांची मागणी केली, तर थेट कार्यवाही होईल!”

मोताळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये घरकुल हप्त्यांसाठी ५ ते २० हजार रुपयांपर्यंत लाच मागितली जाते, अशा गंभीर तक्रारी लाभार्थ्यांनी केल्या होत्या. या तक्रारींनंतर आमदार गायकवाडांनी पंचायत समिती सभागृहात संबंधित कंत्राटी अभियंते, रोजगार सेवक आणि अधिकारी यांची झाडाझडती घेतली.

Local Body Elections : बुलढाणा, खामगाव, नांदुरा आणि लाेणार खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी

“गोरगरिबांच्या हक्काच्या योजनांमध्ये जर कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर त्याची नावे घेऊनच कारवाई केली जाईल. पैसे मागणाऱ्यांना गय केली जाणार नाही,” असंही ते म्हणाले.

या प्रसंगी आमदार गायकवाडांनी राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याशी फोनवर थेट चर्चा केली. त्यांनी रोजगार सेवकांचे प्रलंबित मानधन तातडीने सोडविण्याची मागणी केली आणि घरकुल विभागातील अडचणींबाबत सविस्तर माहिती दिली.

आमदार गायकवाड म्हणाले, “एकदा संधी देतो… पण पुढच्या वेळी पुन्हा तक्रारी आल्यास, कुणालाही पाठीशी घालणार नाही. संबंधितांना हटवून नवीन लोकांना जबाबदारी दिली जाईल.”

Ravikant Tupkar : ‘शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत; याला जबाबदार व्यवस्था आहे’

गटविकास अधिकारी अशोक काळे यांनी सभेचे प्रास्ताविक करत तक्रार निवारणासाठी अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक पंचायत समितीच्या बोर्डावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे लोकाभिमुख प्रशासन सुरू झाले आहे. या बैठकीला सरपंच संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव लहासे, शिवसेना पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.