Sanjay Gaikwad : चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बुलढाण्याची जागा सोडतो

Politics Heats Up Over MLA’s Statement : आमदार गायकवाडांच्या वक्तव्याने राजकारण तापले!

Chikhli आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिखलीत शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) आढावा बैठकीत बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या स्फोटक वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात चांगलाच खळबळजनक धुराळा उडाला आहे.

“युती करायची असेल तर ती संपूर्ण जिल्ह्यात सन्मानजनक पद्धतीने करा. काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी नाही, असे आम्ही होऊ देणार नाही. चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, बदल्यात मी बुलढाण्याची जागा सोडतो,” असे ठाम विधान आमदार गायकवाड यांनी करताच सभागृहात एकच उत्साहाची लाट उसळली.

Election Commission : मतदार ओळखपत्र देण्यात हलगर्जीपणा, दिवाळीचे कारण

चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत इच्छुक उमेदवारांची चर्चा झाली. या बैठकीस आमदार संजय गायकवाड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी युती आघाडीबाबत सुरू असलेली अनिश्चितता आणखी वाढली आहे.

गायकवाड म्हणाले, “युतीचा अंतिम निर्णय आमचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार, जिल्हा प्रमुख आणि जिल्हा कमिटी घेतील. मात्र शिंदे शिवसेना चिखलीत स्वबळावर लढण्यास सज्ज आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे तालुक्याचे राजकीय तापमान चांगलेच चढले आहे.

Vidarbha Farmers : तहसील कार्यालयासमोर ‘डफडे बजाओ आंदोलन’!

बैठकीला जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, पक्ष निरीक्षक विजय अंभोरे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हा प्रमुख शिवाजीबापू देशमुख, अनुजाताई सावळे, जिजाताई राठोड, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत माजी नगरसेवक हेमंत खेडेकर, सचिन चोरघडे, समाधान बांडे, पांडा जेठे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन बोर्डे, व्यापारी असोसिएशनचे राकेश चोपडा यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.