Stance of not forming an alliance with BJP in local elections : महायुतीत संघर्षाची ठिणगी; शिंदेसेनेची नाराजी की दबावतंत्र?
Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर उभ्या असताना बुलढाण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेसेनेचे जिल्हा संघटक आणि आमदार संजय गायकवाड यांनी थेट घोषणा करत “उपऱ्या भाजपसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही” असे स्पष्टपणे सांगितले आहे.
या थेट विधानामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. ३० सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार गायकवाड म्हणाले, “मूळ भाजप आमच्यासोबत युती करू इच्छितो, पण उपऱ्या भाजपला आम्ही मान्यता देणार नाही. एवढेच नव्हे, तर उद्धवसेना, काँग्रेस आणि उपरी भाजप एकत्र येऊन शिंदेसेनेविरोधात काम करत आहेत.” त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “बुलढाण्यात युती झाली तरच जिल्ह्यातील इतर ठिकाणी युती होईल.”
Scam in fair price shop : खामगावमध्ये मोठा घोटाळा! १९१ क्विंटल रेशनचे धान्य केले फस्त!
या विधानानंतर बुलढाण्यातील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. स्थानिक निवडणुकांमध्ये महायुती खरोखर एकत्र लढेल की स्वतंत्रपणे, हा प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे. गायकवाडांनी वापरलेला “उपऱ्या भाजप” हा उल्लेख भाजप गोटातही चांगलाच खवळा निर्माण करणारा ठरला आहे. काही भाजप नेत्यांनीच प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे की, “शिवसेनेतून भाजप-राष्ट्रवादीचा प्रवास करून पुन्हा शिवसेनेत दाखल झालेल्यांना उपरे कोण म्हणावे?
Heavy Rain : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, हजारो उतरले रस्त्यावर
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, नगराध्यक्ष पदासाठी भाजप स्वबळावर जाण्याची तयारी करत असल्याने शिंदेसेनेत अस्वस्थता आहे. त्याचाच परिणाम म्हणून आमदार गायकवाड यांनी थेट पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली, असे बोलले जात आहे. उद्धवसेना, काँग्रेस आणि भाजपमधील काही गट एकत्र येऊन शिंदेसेनेला बुलढाण्यात घेरण्याची तयारी करत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे बुलढाण्यातील हे राजकीय वादळ आता राज्यभर पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








