fight between sanjay gaikwad and vijayraj shinde will affect mahayuti : गायकवाड-शिंदे संघर्षामुळे महायुतीचे गणीत बिघडणार
Buldhana बुलढाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यातील दीर्घकालीन संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही राजकीय स्पर्धा आता अधिक आक्रमक वळणावर गेली असून, त्याचे पडसाद स्थानिक सत्तासमीकरणांवर उमटताना दिसत आहेत. अलीकडील आरोप-प्रत्यारोपांमुळे हा संघर्ष पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या संघर्षाचा परिणाम आता महायुतीवर होण्याची शक्यता आहे.
वादाची सुरुवात १५० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या हिशेबावरून झाली असल्याचे बोलले जात असताना, आता हा संघर्ष थेट १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यापर्यंत पोहोचल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विजयराज शिंदे यांनी दिलेला १५ दिवसांचा अल्टिमेटम आणि त्यावर गायकवाड यांनी केलेला पलटवार यामुळे स्थानिक पातळीवर समर्थकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
School bus fare : शालेय बस भाडे नियंत्रणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
या संघर्षात केवळ वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप न राहता आश्रमशाळा, विविध विकासकामे, निधी वाटप आणि समिती अहवाल यांसारखे संवेदनशील मुद्दे पुढे येऊ लागल्याने हा वाद अधिक व्यापक स्वरूप धारण करत आहे. त्यामुळे हा संघर्ष फक्त दोन नेत्यांपुरता मर्यादित नसून बुलढाण्यातील स्थानिक सत्तासंतुलन, प्रभावक्षेत्र आणि पक्षांतर्गत गटबाजीचे संकेत देणारा ठरत आहे.
Asha bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; भारतीय संगीतविश्वावर शोककळा
विशेष म्हणजे, महायुतीच्या राजकारणातच हा संघर्ष उघडपणे समोर येत असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर संघटनात्मक समन्वयाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादाचे परिणाम उमेदवारी वाटप, गटबाजी आणि मतदारांवरील प्रभाव या पातळ्यांवर दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








