Sanjay Gaikwad : चिखलीत संपर्क मोहीम, गायकवाड पिता-पुत्र मैदानात!

Sanjay-gaikwad-and-son-in-chikhli-constituency-shinde-sena : नेमके राजकीय गणीत काय? शिंदेसेनेतील नवी समीकरणे

Chikhli जिल्ह्यात सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट)च्या गोटात सुरू असलेल्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे पुत्र चिखली मतदारसंघातील विविध गावांमध्ये संपर्क सभा घेत असून स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवण्यावर भर देत आहेत.

काही दिवसांपूर्वी गायकवाड यांनी चिखलीतील नागरिकांच्या सेवेसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक जाहीर करत, विविध समस्यांबाबत थेट संवाद साधण्याचे आवाहन केले होते. नागरिकांच्या अडचणींना प्राधान्याने मार्गी लावले जाईल, असा संदेश देण्यात आला असला तरी या उपक्रमामागील राजकीय गणितांबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

विशेष म्हणजे, लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकांच्या काळातही अशाच प्रकारच्या जनसंपर्क उपक्रमावरून चर्चा रंगली होती. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आ. गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देत सामंजस्याचा संदेश दिल्याची राजकीय चर्चा होती.

Amravati Municipal Corporation : अमरावती महापालिकेच्या तिजोरीची चावी कुणाकडे?

आता पुन्हा संपर्क मोहिमेला वेग आल्याने पक्षांतर्गत समीकरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आ. संजय गायकवाड आणि प्रतापराव जाधव यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे का, की ही केवळ संघटनबांधणीची रणनीती आहे, याबाबत स्पष्टता नसली तरी राजकीय वर्तुळात कुजबुज वाढली आहे.

Buldhana Politics : बुलढाण्यात राष्ट्रवादी पुन्हा ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये?; संघटनबांधणीला वेग

या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघात शिंदेसेनेची पुढील संघटनात्मक दिशा काय असेल, स्थानिक नेतृत्वाची भूमिका कशी राहील आणि आगामी निवडणुकांसाठी कोणती रणनीती आखली जाईल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.