Sanjay Nirupam : उबाठाचे नवे आराध्य दैवत औरंगजेब !

Shiv Sena deputy leader and spokesperson Sanjay Nirupam’s scathing criticism of Uddhav Thackeray : शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांची घणाघाती टीका

Mumbai : नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण कऱणाऱ्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. मातोश्रीवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला.

निरुपम पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना तैमुरची काळजी किती वाटते, यापेक्षा संजय राऊत यांना महाराष्ट्रातील दंगलखोरांची खूप काळजी वाटतेय. मुस्लिम मतांसाठी मुल्ला संजय राऊत हिंदू विरोधी भूमिका घेत असल्याची खरमरीत टीका निरुपम यांनी केली. नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे. त्यांची मालमत्ता विकून शासनाने नुकसान भरपाई वसूल करावी. नागपूर शहरातील संशयित दंगेखोरांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला जावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

Vijay Wadettiwar : महायुतीमध्ये अमित शाह यांना न माननारा एक गट !

नागपूर हिंसाचारात आतापर्यंत १०४ संशयीतांना अटक झाली आहे. काल अटक झालेला सोशल मिडिया इन्फ्लुअंर्स हा इंडियन मुजाहिद्दीन संघटनेशी संबधित आहे. यापूर्वी मोमीनपुऱ्यात काही सोशल मिडिया इन्फ्लुएंर्सने आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. मुस्लिम मतांसाठी उबाठा गट या संशयित लोकांची पाठराखण करत आहेत, यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असे निरुपम म्हणाले. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे मुस्लिमधार्जिणी भूमिका घेऊन हिंदु लोकांची बदनामी करत आहेत, असे निरुपम म्हणाले.

उबाठाने हिंदुत्वापासून युटर्न घेतला आहे. केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला उबाठाने विरोध केला आहे. यासाठी देशातील मौलानांबरोबर उबाठाने बैठक केली. या बैठकीसाठी मुल्ला संजय राऊत यांनी प्रयत्न केले. मुस्लिम मतांसाठी उबाठाने विचारांशी तडजोड करुन प्रो मुस्लिम भूमिका घेतली. ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुस्लिमांची पाठराखण करतात.

Chhagan Bhujbal : संत परंपरेच्या महाराष्ट्रात चाललंय काय?

स्वर्गीय मुलायम सिंग यांनी मुस्लिमांची बाजू घेतली होती. त्यावरुन त्यांना मुल्ला मुलायम, असे बोलले जात होते, आता तशाच प्रकार उबाठाचे खासदार संजय राऊत हे मुल्ला संजय राऊत झाले आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली. दिशा सालियन प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर कोर्टाने गांभीर्याने विचार करुन पोलीसांना नव्याने तपास करण्याचे आदेश द्यावेत, असे मत निरुपम यांनी व्यक्त केले.