व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Chhagan Bhujbal : संत परंपरेच्या महाराष्ट्रात चाललंय काय?

Chhagan Bhujbal : संत परंपरेच्या महाराष्ट्रात चाललंय काय?

 

We do not accept the Banthia Commission report said Chhagan Bhujbal : बांठीया कमिशनचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही

Jalgaon : महाराष्ट्रात सध्या चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. विशेषतः मराठवाड्यात मारहाणीचे अनेक प्रकार घडत आहेत. बीडमध्ये घडलेल्या देशमुख प्रकरणाचा आम्ही सगळ्यांनी निषेध केला. माणूस मारत असाल तर आम्ही सर्वच त्याचा विरोध करणार. हा यंत्रांचा, तंत्रांचा, मंत्राचा महाराष्ट्र आपण म्हणतो. महापुरुषांचा, संत परंपरेचा हा महाराष्ट्र आहे. पण संतांच्या महाराष्ट्रात हे काय चाललंय, असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

काल (२२ मार्च) जळगावमध्ये आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना त्यांनी मराठवाड्यात घडत असलेल्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, बीडमधील शिरुर सतीश उर्फ खोक्या भोसले याने दिपक ढाकणे व महेश ढाकणे या पिता पुत्रांना तोंडातुन रक्त येईपर्यंत बॅटने जबर मारहाण केली. संभाजीनगरमध्ये एका महिलेवर कटरने येवढे वार केले की २५० टाके पडले. परभणी प्रकरणात दलित समाजाचा सोमनाथ सुर्यवंशी याला पोलिसांनी एवढी मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला. लातुरच्या माऊली सोट हा धनगर समाजाचा माणूस त्यालादेखील मारहाण झाली.

Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची मला चिंता नाही, ओबीसींचे रक्षण महत्वाचे !

क्रुरता येते कुठून ?
कैलास बोऱ्हाडे नावाच्या एका धनगर समाजाच्या तरुणाला लोखंडी सळ्यांनी चटके दिले. एव्हढी अमानुषता- क्रुरता येते कुठुन? शंकराच्या मंदीरात प्रवेश केला म्हणुन मारहाण अहिल्याबाई होळकर यांनी महादेवाच्या मंदीरांची स्थापना केली. त्याच धनगर समाजाला शंकराच्या मंदीरात प्रवेश केला म्हणून मारहाण केली. हा क्रूरपणा महाराष्ट्रात या अगोदर नव्हता. हा महाराष्ट्र संताचा , एक सुसंकृत परंपरेचा आहे, तो आपल्याला टिकवावा लागेल. जेथे अन्याय होत असेल, तेथे जाऊन आपण आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

भारतरत्नपेक्षा महात्मा मोठा..
आता सध्या महात्मा फुले यांना भारतरत्न द्या अशी मागणी होत आहे. माझा विरोध नाही मात्र भारतरत्न पेक्षा महात्मा ही पदवी सगळ्यांत मोठी आहे. गेल्या काही वर्षांत आपण अनेक कार्य मार्गी लावले आहे. मंत्रालयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावले. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक मार्गी लागले. भिडेवाडा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी ५० कोटी निधीची तरतुद महायुती सरकारकडून करण्यात आली. त्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या १ मे पर्यंत आपण त्याचे काम पूर्ण करू, असे भुजबळ म्हणाले.

Devendra Fadanvis : दिव्यांगांकरीता काम करणाऱ्या संस्थांच्या अडचणी सोडवणार !

सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात ७५० कोटी रुपये हे अण्णासाहेब आर्थिक महामंडळाला दिले आणि फक्त ५ कोटी रुपये हे ओबीसी महामंडळाला दिले. सर्व मागासवर्गीय समाज एकत्रित केला तरी ४७ कोटी रुपये देखील होत नाहीत. यावेळी मी सभागृहातदेखील भूमिका मांडली आणि मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. सर्व महामंडळांना आपण समान निधी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसे आदेशही त्यांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

chhagan bhujbal : महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ, भुजबळांच्या प्रयत्नांना यश

महाराष्ट्रात आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यात बांठिया आयोगाने दिलेला रिपोर्टप्रमाणे आरक्षण लागू होईल. आमचा त्या रिपोर्टलाच विरोध आहे. त्यात ओबीसी घटकांची संख्या कमी दाखवण्यात आली आहे. ज्या गावचा सरपंच ओबीसी आहे, त्या गावात एकही ओबीसी नाही, असा रिपोर्ट बांठीया कमिशनने दिला आहे. त्यामुळे हा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही, असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!