Breaking

Sanjay Raimulkar : विकासकामांमध्ये माजी आमदारच आघाडीवर?

The former MLA is in the forefront in development works : साठ लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण

Buldhana मेहकर मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर माजी आमदार डाॅ. संजय रायमुलकर चांगलचे सक्रीय झाले आहेत. येथील अंबिका देवीच्या माळावरील सभामंडप २० लक्ष रुपये, साई मंदिर पेव्हर ब्लॉक १५ लाख रुपये तसेच मुस्लिम शादी खाना २५ लाख रुपये अशा एकूण ६० लाख रुपयांच्या कामाचे लोकार्पण करण्यात झाले.

यामध्ये मुस्लिम समाजासाठी २५ लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या भव्य शादीखान्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शादीखान्याच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच अंबिका देवीच्या माळावर असलेल्या मंदिरात देण्यात आलेला १५ लाख रुपयांच्या सभा मंडपामुळे त्या ठिकाणी इतर होणारे धार्मिक कार्यक्रमासाठी आता मोठी जागा उपलब्ध झाली आहे.

Collectorate of Buldhana : ‘महारेशीम’ ठरेल औद्योगिक वरदान !

या ठिकाणी कोणतेही धार्मिक कार्यक्रम सहजरित्या चांगल्या पद्धतीने देवीच्या माळावरील या सभा मंडपामुळे होतील. अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी अनेक मान्यवरांनी व्यक्त केला. यासोबतच साई मंदिर परिसरात १५ लक्ष रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्यामुळे साई परिसर अतिशय सुंदर झाला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे होणार असल्याचे यावेळी डॉ. संजय रायमुलकर यांनी सांगितले.

IPS Shivdeep Lande : दबंग आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा अखेर मंजूर !

अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झालेले हे तीन्ही बांधकाम स्थानिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या वास्तूच्या उभारणीसाठी डॉ.संजय रायमुलकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. लोकांच्या गरजांना अनुसरून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.