
Yavatmal-district-annual-plan-2026-27-approved : शेतकरी सक्षमीकरण आणि आदिवासी कल्याणावर बजेटचा फोकस
Yavatmal यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला वेग देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ६९२.७४ कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक आराखडा आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या आराखड्यामुळे जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांसारख्या मूलभूत प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी मोठी आर्थिक ताकद मिळणार आहे. विशेष म्हणजे, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख पुसण्यासाठी या बजेटमध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Nagpur Municipal Corporation : भाजपच्या नीता ठाकरे नागपूरच्या महापौर!
या ६९२ कोटी ७४ लाखांच्या आराखड्याचे वर्गीकरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. यामध्ये ‘सामान्य जिल्हा वार्षिक योजने’साठी सर्वाधिक ४७१.५८ कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
तसेच, ‘आदिवासी उपयोजने’साठी १३७.१६ कोटी आणि ‘अनुसूचित जाती उपयोजने’साठी ८४ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीने या प्रारूप आराखड्याला हिरवा कंदील दाखवला असून, आता अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे धाडला जाणार आहे.
“यवतमाळ जिल्ह्याचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे,” असे ठाम प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केवळ मदतीचे हात न देता, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नव्या उपाययोजना राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध जाण्याची शक्यता
याशिवाय, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारणे आणि दुर्गम आदिवासी भागातील जीवनमान उंचावणे यावर या बजेटचा मुख्य भर असेल. प्रशासनाने तयार केलेल्या या आराखड्यात स्थानिक रोजगाराला चालना देणाऱ्या लहान उद्योगांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे यवतमाळमधील तरुणांना गावातच काम मिळण्यास मदत होईल.








