Breaking

Sanjay Raut : ‘त्या’ पुरस्कारासाठी एकनाथ शिंदे यांची निवड योग्यच !

Eknath Shinde’s selection for ‘that’ award is right : संजय राऊत यांनी साधला निशाणा

Mumbai : महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला जातो आहे. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावरून शिवसेना उद्धव टाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला.

शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का, अशीही चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. यासंदर्भात मुंबई येथे आज (११ फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आहेत की नाही, हे माहिती नाही. पण महादजी शिंदे यांच्या नावाने एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात येत आहे. माहिती अशी आहे की, ते महादजी ब्रिटीशांना सामील झाले होते. झाशीच्या राणीला संघर्षाच्या वेळी महादजींच्या कुटुंबाने मदत केली नव्हती. त्यामुळे त्या शिंदेंच्या नावाने या शिंदेना पुरस्कार दिला जात असेल तर ही योग्य निवड आहे, असे म्हणत राऊत यांनी शिंदेंना चिमटा काढला.

Crime in Gondia : अविवाहित गर्भवतीचा गळा आवळून खून!

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हा कुठल्यातरी वादातून कुणालाही न सांगता चार्टर्ड प्लेनने पळून गेला. तो बॅंकॉकच्या दिशेने गेल्याचीही माहिती होती. यासंदर्भात विचारले असता, धनाढ्यांची मुलं चार्टड प्लेनने बॅंकॉकला पळून जातात. तर गरीबांची मुलं बेरोजगारीला कंटाळून बेघर अवस्थेत रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी पळून जातात. राज्यात आणि देशात अशा घटना घडत असतात. पण हा त्यांचा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. यावर फार राजकीय चर्चा नको, असे खासदार राऊत म्हणाले.

नवे सरकार येताच जुन्या सरकारचे निर्णय फिरवले जातात, यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही एकनाथ शिंदे मंत्री होते. तेव्हाच शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी शिंदेंनीच योजनेचे उद्घाटन केले होते. त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री होते आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे गरीबांसाठीच्या योजना का बंद केल्या जात आहेत, असा सवाल शिंदेंनी फडणवीसांना करायला हवा, असे राऊत म्हणाले.

Rajendra Shingne, Shashikant Khedkar : विधानसभेत पराभूत उमेदवार मैदानात एकत्र!

आजही एकनाथ शिंदे सरकारचा एक भाग आहेत. लाडका भाऊ, लाडकी बहीण, आनंदाचा शिधा आदी योजना शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून सुरू केल्या होत्या. त्या सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री होते. पण आज फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या योजना एक-एक करून बंद करत आहेत. याविरोधात एकनाथ शिंदेंनी आवाज उठवायला हवा. गरीबांच्या योजना बंद होतात आणि अदानी, अंबानींच्या योजना का सुरू राहतात, हा सवाल शिंदे यांनी केला पाहिजे.

सरकारचा निर्णय हा कुण्या एका पक्षाचा नसतो. बहुमतातील सरकारने घेतलेले निर्णय नवीन सरकार बदलते, हे योग्य नाही. उच्च न्यायालयाने याबाबतीत सरकारला खडे बोल सुनावले आहेत. न्यायालयाची भूमिका बरोबर आहे. पण न्यायालयाला विचारतंय कोण? न्यायालयांच्या सूचनांची अंमलबजावणी ना केंद्र सरकार करत ना राज्य सरकार. सर्वत्र मनमानी सुरू आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

Local Body Elections : राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोइंग वाढले

दोन्ही सरकारमध्ये शेतकऱ्यांबद्दल कोणत्याही संवेदना शिल्लक राहिलेल्या नाहीत. एमएसपीवर कोणतीही योजना आखली नाही. कापूस, सोयाबीन संदर्भात योजना नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. फडणवीस सरकारला शेतकऱ्यांबद्दल तसुभरही आस्था नाही, असा आरोपही खासदार राऊत यांनी केला.